# stephen hawking
इतिहास स्वत:चीच पुनरावृत्ती करत असतो असे म्हणतात. अनेक वेळा तसे घडणे हे मानवतेच्या भल्यासाठीही असू शकते. आधुनिक विज्ञानाचा जनक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गॅलिलिओला आयुष्याची शेवटची आठ वर्षे तत्कालीन धर्मसत्तेच्या नजरकैदेत राहावे लागले. शिवाय वयपरत्वे आलेल्या अंधत्वामुळे अंध:काराने त्याला घेरले. त्याच्या मनाचा विलक्षण कोंडमारा झाला. पण त्याची आंतरिक शक्ती प्रचंड दांडगी! जन्मभर अतिकष्टाने मिळवलेले ज्ञान सामान्यजनांपर्यंत पोहोचविण्याच्या प्रयासांत तो जगत गेला आणि मृत्यूही पावला. ती तारीख होती : ८ जानेवारी १६४२!
कदाचित नियतीचा बालिश खेळ असेल, पण बरोब्बर तीनशे वर्षांनी याच दिवशी- म्हणजे ८ जानेवारी १९४२ रोजी गॅलिलिओच्या तोडीस तोड असा आणखी एक महामानव जन्माला आला. त्याचे नाव- स्टीफन विल्यम हॉकिंग! ‘जीनिअस’ या शब्दाने वर्णन करता येईल अशी असामान्य प्रज्ञा आणि प्रतिभा, विज्ञानावरील तीच अपार व उत्कट श्रद्धा आणि.. आणखी एक महत्त्वाचे साम्यस्थळ- ते म्हणजे अशा अलौकिक मानवी गुणांना जखडून टाकणारी, हतबल करू पाहणारी एक निर्घृण कैद! स्वत:चे शरीरच स्वत:चे वैरी झालेले. एका दुर्मीळ आणि असाध्य अशा रोगाच्या भक्ष्यस्थानी पडत जाणारे! तीनशे वर्षांपूर्वीच्या आपल्या दिग्गज पूर्वसुरीचा आणखी एक महत्त्वाचा गुण हॉकिंगजवळ होता. अपार जिद्द आणि मनोबल! आत्मकणवेचा डाग आपल्या चैतन्यमय मनावर पडू न देण्याचा खंबीरपणा! जर्जर शरीराच्या पिंजऱ्यातील आपल्या प्रतिभेला नैराश्याच्या कारावासात कैद न करता दिगन्तात विहरू देण्याची उन्मुक्तता! अशा या विलक्षण व्यक्तित्वाची एक चुणूक वैज्ञानिक- जगताला दिसली ती २९ एप्रिल १९७९ या दिवशीकेंब्रिज विद्यापीठाची जगप्रसिद्ध कॅव्हेंडीश प्रयोगशाळा हे स्थळ. ‘लुकेशियन प्रोफेसर ऑफ मॅथेमॅटिक्स’ हे सन्माननीय पद प्रदान करण्याचा समारंभ. पद स्वीकारणारी व्यक्ती व्हीलचेअरवर बसून सभागृहात आलेली! त्या व्यक्तीचे नाव- डॉ. स्टीफन हॉकिंग. त्यांच्या शुभारंभाच्या भाषणाचा विषय होता- ‘सैद्धान्तिक पदार्थविज्ञानाचा अंत नजरेच्या टप्प्यात आला आहे का?’
विकलांग शरीराच्या, परंतु दुर्दम्य मनोबलाच्या हॉकिंग यांनी स्पष्टपणे सांगितले, ‘‘होय, आला आहे. विज्ञानाचे परमपवित्र तीर्थस्थान गाठण्यासाठी चला माझ्याबरोबर एका रोमांचक सफरीवर. अवकाश आणि काळाच्या टप्प्याला मागे टाकून एक असा संयुक्त सिद्धान्त शोधू या- ज्यायोगे विश्वाचा संपूर्ण खुलासा मिळेल.’’इतकेच बोलून ते थांबले नाहीत. त्यांनी जाहीरच करून टाकले, की नजीकच्या काळात सैद्धान्तिक विज्ञान क्षेत्राची आवश्यकता संपुष्टात येणार आहे. ‘सर्वसमावेशक सिद्धान्त’ (थिअरी फॉर एव्हरीथिंग) प्रस्थापित झाला की त्यांच्यासारख्या सैद्धान्तिकांना काही कामच उरणार नाही.हा होता प्रखर आत्मविश्वास! त्यांच्या अंत:चक्षूंना जाणवणाऱ्या विश्वाच्या जगड्व्याळ स्वरूपामागची साधीसुधी यंत्रणा आणि नैसर्गिक नियमावली यांचा शोध घेण्याची दुर्दम्य इच्छाशक्त .
गॅलिलिओप्रमाणेच न्यूटन आणि आइनस्टाईन यांच्याबरोबरही हॉकिंग यांचे काही नाते जुळलेले असावे. न्यूटन यांना ३१० वर्षांपूर्वी- म्हणजे सन १६६९ मध्ये याच केंब्रिज विद्यापीठाने हीच लुकेशियन प्रोफेसरशिप प्रदान केली होती आणि ज्या वर्षी ते पद हॉकिंग यांना मिळाले ते वर्ष होते आइनस्टाईन यांच्या जन्मशताब्दीचे! या सर्व योगायोगांचा हॉकिंग यांना मनापासून अभिमान वाटे. त्यापलीकडे जाऊन या दिग्गज पूर्वसुरींच्या सैद्धान्तिक शास्त्राचा कसून अभ्यास करण्याची त्यांची वृत्ती होती.वाढत्या आजाराच्या प्रमाणातच वैश्विक संशोधनाची इच्छा त्यांच्यात बळावत गेली होती. त्यातच रॉजर पेनरोझसारखा तरुण गणिती त्यांचा मित्र झाला. दोघांनी मिळून ‘सिंग्युलॅरिटीज’चा सिद्धान्त मांडला. हा सिद्धान्त थोडक्यात असा होता : ‘ताऱ्याच्या पोटातील अणुइंधन संपल्यानंतर तो स्वत:च्या गुरुत्वाकर्षणाने स्वत:च्या केंद्राकडे ढासळू लागतो. अतिलहान आकारमानात येईपर्यंत तो ढासळतो. त्यावेळी त्याची घनता अमर्याद होते. तो बिंदूवत होतो. अशा बिंदूला सिंग्युलॅरिटी म्हणतात.’ सिंग्युलॅरिटीच्या संकल्पनेतूनच हॉकिंग यांना कृष्णविवराची संकल्पना सुचली. आइनस्टाईनच्या व्यापक सापेक्षतावादाचा आधार घेऊन विश्वाला आरंभबिंदू आहे असे सिद्ध करणारे हॉकिंग आणि त्यांचे मित्र पेनरोझ हे पहिले वैज्ञानिक होते. याच संशोधनामुळे त्यांना आद्य महास्फोटाचे भाकीत करता आले आणि विश्वामधल्या कृष्णविवरांच्या अस्तित्वाविषयी स्पष्ट विचार मांडता आले. विश्वनिर्मितीच्या क्षणी निर्माण झालेल्या अतिसूक्ष्म कृष्णविवरांचे भाकीतही हॉकिंग यांनी मांडले.हॉकिंग यांनी मांडलेला सर्वात क्रांतिकारी सिद्धान्त म्हणजे त्यांनी घडवलेले व्यापक सापेक्षतावाद आणि पुंजवाद यांचे संयुक्त उपयोजन! हे एक प्रचंड आव्हान होते. इतके, की आइनस्टाईननादेखील जन्मभर प्रयत्न करून या दोन मौलिक संकल्पनांचा परस्परांशी ताळमेळ जुळवता आला नव्हता. विसाव्या शतकात उदयाला आलेल्या या संकल्पना आधुनिक विज्ञानाची पायाभरणी करणाऱ्या आहेत.मात्र, या संकल्पनांचा संयोग घडवून त्यातून एक संयुक्त सिद्धान्त मांडणे अवघड असण्याचे कारण म्हणजे या दोन्हींच्या मुळाशी अंतर्भूत असे विरोधाभास आहेत. पुंजवाद सांगतो की, अगदी सूक्ष्म अंतरामध्ये ‘अनिश्चितता तत्त्व’ काम करते आणि तिथे प्रचंड प्रमाणात ऊर्जा असते. सापेक्षतावाद सांगतो की, अतिसूक्ष्म अंतरांमध्ये कोंडलेली प्रचंड ऊर्जा ढासळून कृष्णविवरांमध्ये रूपांतरित होते. या दोन संकल्पनांच्या एकत्रीकरणामुळे असा अर्थ निघतो की अवकाश (Space) आणि काळ (Time) हे अगोदरच संपूर्णपणे ढासळलेले असायला पाहिजे होते. आणि कृष्णविवरांमध्ये लुप्त झाल्यामुळे त्यांना स्वत:चे विशेष असे स्वतंत्र अस्तित्वच राहिले नसते किंवा मग ते संपुष्टात आले असते.वरील दोन्ही सिद्धांतांना स्वतंत्रपणे मान्यता मिळालेली असली तरी त्यांच्यामधील या अंतर्विरोधाने आइनस्टाईनसकट भल्याभल्यांना बुचकळ्यात टाकले होते. कृष्णविवरांच्या बाह्य़ सीमेवर पुंजवाद लागू करण्याचे गणनमापन करणारे हॉकिंग हे पहिले वैज्ञानिक ठरले आहेत. कृष्णविवरांच्या बाह्य़ सीमेवर (बाह्य़ सीमा = = edge, यालाच घटना क्षितीज किंवा ‘Schwarzschild Radius’ असे वैज्ञानिक परिभाषेत म्हणतात.) कार्यरत असलेल्या पुंजिक प्रक्रियांमुळे कृष्णविवरांतून ऊर्जेचे प्रारण (Radiation) होते, असे हॉकिंग यांनी गणितातून सिद्ध केले.त्यामुळेच असे म्हणावे लागते की, कृष्णविवर हे पूर्णपणे काळे (अदृश्य) नसतेच. कारण ‘हॉकिंग रेडिएशन’च्या तत्त्वानुसार ही विवरे ऊर्जेला बाहेर टाकतात. पुंजवाद आणि सापेक्षतावाद यांच्या मिलाफातून निर्माण होणाऱ्या घडामोडींचे गणनमापन करणारे अध्वर्यु या नात्याने हॉकिंग यांनी हेही सिद्ध केले की, कृष्णविवरांची स्थिरता ही कायमस्वरूपी नसते.अखिल विज्ञानजगत आणि व्यक्तिश: मी स्वत: हॉकिंग यांच्या या संशोधनाचे ऋणी आहोत. अतिसूक्ष्म आणि अतिप्रचंड अंतरावर घडणाऱ्या वैज्ञानिक घडामोडींमधील पूल सांधण्याचे काम तर त्यांच्या या संकल्पनांनी झालेच; शिवाय या संशोधनामुळे आम जनतेमधील अवैज्ञानिक मानसिकतेच्या घटकांच्या मनातील शंका व भीती यांचे निराकरणही करता आले. स्वित्र्झलडमधील ‘सर्न’ प्रयोगशाळेमध्ये ‘लार्ज ह्रेडॉन कोलायडर’वर (एलएचसी) उच्च-ऊर्जा प्रयोग चालू असताना निर्माण होणारी अतिसूक्ष्म (Microscopic) कृष्णविवरे क्षणार्धात वाढून पृथ्वीला गिळंकृत करतील, या भीतीचे सावट जनमानसात निर्माण झाले होते. ‘हॉकिंग रेडिएशन’च्या आधारावर मी एक सैद्धान्तिक अभ्यास हाती घेतला व एक शोधनिबंध प्रसिद्ध केला. त्याचे शीर्षक होते- ‘Production and Decay of spinning Black Holes at Colliders and Tests of Black Hole Dynamics’ (‘फीजिकल रीव्ह्य़ू डी- ६०’मध्ये १८ डिसेंबर २००२ रोजी प्रकाशित) या निबंधात असे म्हटले होते की, अशी निर्माण झालेली कृष्णविवरे इतकी सूक्ष्म असतात की जवळच्या प्रोटॉन किंवा न्यूट्रॉन यांच्यामधील ऊर्जा शोषून स्वत:मध्ये साठविण्यासाठी जे अंतर कापावे लागते, त्यापूर्वीच त्यांची वाफ होऊन जाते.असे घडण्याचे कारण हे की, कृष्णविवरांची ऊर्जा उत्सर्जनाची गती त्यांच्या आकारमानाच्या व्यस्त प्रमाणात वाढते. ज्यामुळे अतिसूक्ष्म कृष्णविवरांमध्ये ती प्रचंड प्रमाणात वाढलेली असते. या सिद्धान्ताला अनुसरून ही अतिसूक्ष्म कृष्णविवरे धोक्याच्या पातळीवर पोहोचण्यापूर्वीच उत्सर्जनाने विरून जातात.
या पाश्र्वभूमीवर सर्व शंका फोल ठरल्या आहेत. इतकेच नव्हे तर ‘एलएचसी’ने नऊ वर्षे अविरत काम करून ‘हिग्ज बोसॉन’चा भव्य शोध लावला.इथे हेही सांगितले पाहिजे की, जागतिक स्तरावरचा सर्वात भव्य असा ‘एलएचसी’-वरचा वैज्ञानिक प्रयोग सन २०३५ पर्यंत कार्यरत राहावा यादृष्टीने ‘एलएचसी’ची कार्यक्षमता वाढविण्याच्या योजना चालू आहेत. ‘एलएचसी’मध्ये कृष्ण-जडतत्त्वाचे मूलकण निर्माण करणेदेखील हॉकिंगच्या संशोधनामुळे शक्य होणार आहे. तसेच विश्वामध्ये प्रतिजडतत्त्वापेक्षा जडतत्त्वाचे प्रमाण अधिक का आहे, याचा खुलासा करू शकणाऱ्या आणखी जास्त प्रकारच्या हिग्ज बोसॉनच्या खुणा आपल्याला दिसू शकतील.विश्वोत्पत्तीच्या क्षणी (म्हणजे महास्फोटाच्या क्षणी) आरंभ झालेल्या काळापासून ते दिक्कालापर्यंत झालेल्या विश्वाच्या वाटचालीची जाण, मूलकणांबद्दलची जाण आणि अतिसूक्ष्म अंतरावर होणाऱ्या नैसर्गिक बलांच्या दळणवळणाची जाण- या तिन्हींचे एकत्रीकरण करून हा ज्ञानाचा वारसा हॉकिंगने आपल्या हाती सोपविला आहे.वयाच्या २२ व्या वर्षी Amyotrophic Lateral Sclerosis (ALS) या असाध्य रोगाची लक्षणे हॉकिंगमध्ये आढळली. हा रोग मज्जातंतूमध्ये बिघाड घडवणारा असतो आणि माणसाच्या सर्व नैसर्गिक शारीरिक शक्तींचा तो ऱ्हास करतो. अमेरिकेत या रोगाला बळी पडलेल्या एका बेसबॉल खेळाडूच्या नावावरून Lou Gehrig’s Disease असे त्याला नाव पडले. रोगाचे निदान झाल्यावर हॉकिंग फार तर दोन वर्षे काढतील असे वैद्यकीय भाकीत केले गेले होते. सुदैवाने हॉकिंग यांचा रोग फार वेगाने बळावला नाही. तरीही वयाच्या ३७ व्या वर्षी लुकेशियन पद स्वीकारताना त्यांची अवस्था फारच दयनीय होती. चालणे, लिहिणे, स्वत:च्या हाताने जेवणे या क्रिया अशक्यप्राय झाल्या होत्या. इतकेच नव्हे तर डोकं पुढे झुकून हनुवटी छातीला टेकली तरी स्वत:हून मान ताठ करणेही त्यांना जमेनासे झाले होते.ऐन उमेदीत जडलेल्या या विलक्षण रोगामुळे हॉकिंगचा चैतन्यपूर्ण आत्मा जर्जर देहाच्या पिंजऱ्यात कोंडला गेला होता. आयुष्याची ५५ वर्षे खुर्चीवर जखडले गेलेले, वाचा हरवलेले आणि गतिशून्य झालेले हॉकिंग आपल्या जन्मजात विनोदबुद्धीला मात्र पारखे झाले नव्हते. ते म्हणत की, अशा असहायतेमुळे त्यांच्याजवळ विचार करायला भरपूर मोकळा वेळ असतो. या बोनस वेळामध्ये त्यांनी आपल्या कल्पनाशक्तीला मुक्त विहरू दिले आणि अवकाश-काळ या आयामांमध्ये बांधलेल्या विश्वाची काळाच्या आरंभबिंदूपासून ते दिक्कालापर्यंत प्रस्थापित झालेली कार्यपद्धती सांगणारे तर्कज्ञान त्यांनी जगापुढे मांडले.आइनस्टाईन म्हणाले होते की, विश्वाबद्दलची सर्वात अनाकलनीय गोष्ट आहे ती ही, की अशा या अनाकलनीय विश्वाचे आकलन होऊ शकते. माणसाच्या प्रबळ अंत:प्रेरणेचे व इच्छाशक्तीचे हॉकिंग हे एक देदीप्यमान उदाहरण आहे. रोगजर्जर शरीराच्या अडसराची तमा न बाळगणारे आणि चैतन्याने ओसंडणारे हॉकिंगचे मन हे मानवाच्या सामूहिक प्रगतीचा मुख्य आधार आहे, मानवतेच्या वाटचालीवरची तेवती मशाल आहे. हॉकिंग यांचे जीवन आणि त्यांची त्रिकालदृष्टी आपल्याला चिरंतन प्रेरणा देत राहील.
-------++-----------------+--------------------
English Translation :-
It is said that history repeats itself. Many times this can happen for the good of humanity. Galileo, known as the father of modern science, spent the last eight years of his life in the custody of the then theocracy. Moreover, he was surrounded by blindness due to old age. He had a strange concussion. But his inner strength is enormous! He lived and died in an effort to pass on the knowledge he had acquired throughout his life to the common man. That date was: January 8, 1642!
It may be a childish game of destiny, but exactly three hundred years later, on the same day, January 8, 1942, another great man, Galileo, was born. His name is Stephen William Hawking! Unusual wisdom and genius that can be described by the word 'genius', the same immense and passionate faith in science and .. another important similarity - it is a relentless imprisonment that binds such supernatural human qualities, trying to overcome them! His own body became his own enemy. Falling prey to a rare and incurable disease!
Hawking had another important quality of his veteran predecessor three hundred years ago. Immeasurable perseverance and morale! The determination not to let the stain of self-consciousness fall on your conscious mind! Freedom to give your talent in the cage of a shabby body to the horizon without being imprisoned in the prison of depression! On April 29, 1979, the world saw a trace of such an extraordinary personality.
Cambridge University's world-famous Cavendish Laboratory. Ceremony to confer the honorary title of ‘Lucasian Professor of Mathematics’. The person accepting the post came to the hall in a wheelchair! The person's name is Dr. Stephen Hawking. The theme of his inaugural address was "Has the end of theoretical physics come to an end?"
"Yes, he's here," said Hawking, who has a disability but a strong sense of humor. Come on an exciting journey with me to reach the holiest shrine of science. Let's move beyond the phases of space and time to find a common theory that will reveal the whole universe. "
He did not stop there. He made it clear that the need for a theoretical science field would be eliminated in the near future. The ‘Theory for Everything’ was established that theorists like him would be of no use.
It was intense confidence! An insatiable desire to discover the simple mechanisms and natural laws behind the cosmic nature of the universe that perceives their intuition!
Like Galileo, Hawking must have had some connection with Newton and Einstein. Newton was awarded the same Lucasian professorship by the same Cambridge University 310 years ago - in 1669, and the year in which Hawking received the post was the year of Einstein's birth centenary!
Hawking was proud of all these coincidences. Going beyond that, he had a tendency to study the theoretical sciences of these veteran predecessors.
As the disease progressed, so did their desire for global research. He also befriended a young mathematician like Roger Penrose. Together they proposed the theory of 'singularities'. The theory was as follows: ‘When the star in the star's stomach runs out of fuel, it begins to tilt towards its own center by its own gravity. It shrinks until it reaches a very small size. At that time its density was limitless. He was pointing. Such a point is called singularity. '
Hawking came up with the concept of black hole from the concept of singularity. Hawking and his friend Penrose were the first scientists to prove that the universe is a starting point based on Einstein's broad relativity. This research enabled them to predict the first Big Bang and to give a clear idea of the existence of black holes in the universe. Hawking also predicted microscopic black holes created at the time of creation.
The most revolutionary theory that Hawking proposed was the combined application of his general relativity and capitalism! It was a huge challenge. So much so that even Einstein could not reconcile these two fundamental concepts with his lifelong effort. These concepts, which emerged in the twentieth century, are the foundation of modern science.
However, the reason why it is difficult to combine these concepts and form a joint theory is because of the contradictions inherent in the roots of the two. Capitalism says that the ‘principle of uncertainty’ works even in the smallest distance and there is a huge amount of energy. Relativity says that the tremendous energy stored in the smallest distances is converted into black holes. The amalgamation of these two concepts implies that space and time should have already collapsed completely. And because they were lost in the black holes, they would not have had their own special existence or it would have come to an end.
Although both of the above theories were accepted separately, the contradiction between them confused Einstein and others. Hawking was the first scientist to calculate the application of capitalism to the outer boundary of the black hole. Hawking proved mathematically that the mass processes at the outer boundary of the black hole (outer boundary = = edge, also known as the event horizon or ‘Schwarzschild Radius’) cause radiation of energy through the black hole.
That is why it has to be said that the black hole is not completely black (invisible). Because according to the principle of ‘Hawking radiation’, these holes emit energy. Hawking also proved that the stability of black holes is not permanent, as he calculates the events that result from the combination of capitalism and relativity.
All in all, I am indebted to Hawking for his research. It was his concepts that bridged the gap between the smallest and most enormous scientific phenomena; Moreover, this research has also been able to resolve the doubts and fears of the unscientific mindset elements in the general public. Fear was rife that microscopic black holes formed during high-energy experiments on the Large Hredon Collider (LHC) at the CERN laboratory in Switzerland would swell and swallow the Earth in an instant. I undertook a theoretical study based on Hawking radiation and published a dissertation. It was titled "Production and Decay of Spinning Black Holes at Colliders and Tests of Black Hole Dynamics" (published in "Physical Review D-60" on December 18, 2002), stating that black holes formed are so subtle. That the energy between nearby protons or neutrons evaporates before they can be absorbed and stored within themselves.
This is because the speed at which black holes emit energy increases in proportion to their size. So that it is enlarged in tiny black holes. According to this principle, these microscopic black holes are emitted before they reach the danger level.
Against this backdrop, all doubts have fallen. Not only that, but the LHC worked tirelessly for nine years to invent the Higgs boson.
It should also be mentioned here that plans are afoot to increase the efficiency of LHC with a view to keep the world's largest scientific experiment on LHC working till 2035. Hawking's research will also make it possible to create a black-inert element in the LHC. We can also see signs of more Higgs bosons that can explain why there is more inertia than antimatter in the universe.
Hawking has inherited this knowledge by combining the knowledge of the movement of the universe from the time of the beginning of the universe (the moment of the Big Bang) to Dikkala, the knowledge of the elements and the knowledge of the movement of natural forces at microscopic distances.
At age 22, Hawking developed symptoms of Amyotrophic Lateral Sclerosis (ALS). It is a disease that causes damage to the nerves and destroys all the natural bodily powers of man. He was named Lou Gehrig's Disease after a baseball player who contracted the disease in the United States. It was medically predicted that Hawking would spend at least two years after being diagnosed with the disease. Fortunately, Hawking's disease did not develop very quickly. However, at the age of 37, when he accepted the Lucasian position, his condition was deplorable. Walking, writing, eating with one's own hands were almost impossible. Not only that, even though he leaned his head forward and leaned his chin on his chest, he was not able to straighten his neck.
Hawking's spirited soul was confined to the cage of a shabby body because of this strange disease that was linked to Ain Umeed. Hawking, who has been confined to a chair for 55 years, has lost his speech and has become immobile, but his innate sense of humor has not been discerned. He says that because of such helplessness, he has plenty of free time to think. In this bonus time, he gave free rein to his imagination and presented to the world the logic of the workings of the universe built in the dimensions of space-time, from the beginning of time to Dikkala.
Einstein said that the most incomprehensible thing about the universe is that such an incomprehensible universe can be understood. Hawking is a shining example of man's strong instincts and willpower. Hawking's mind is the mainstay of human collective progress, a burning torch on the path of humanity, unaware of the obstacles of a diseased body and drifting with consciousness. Hawking's life and his three-dimensional vision will continue to inspire us forever.
--------------------+++++++-----------------
Comments
Post a Comment
If you have any doubt, please let me know.