Nobel mine ... Stanford University

नोबेल ची खाण  ...


    अमेरिकेतील जगप्रसिद्ध हॉर्वर्ड विद्यापिठाच्या प्रेसिडेन्टना भेटण्यासाठी म्हणून एक वृद्ध जोडपे अपॉईमटमेन्ट न घेता भेटायला आले. त्या जोडप्याचा वेश नुसताच साधा नव्हता तर गबाळा पण होता. म्हातारबाईंनी घातलेला फ्रॉक अगदी साधा, चुरगळलेला आणि थोडासा मळलेला हेता. तर म्हातारबुवांनी घातलेला सूट पण घरी शिवलेली, ढगाळ, गबाळा आणि इस्त्री न केलेला होता. प्रेसिडेन्टच्या केबिनबाहेर पॉश काऊंटरवर बसलेल्या सेक्रेटरीकडे ते जोडपे आले. 
‘आम्हाला प्रेसिडेन्ट साहेबांची फक्त दहा मिनिटेच भेट हवी आहे! मिळेल का?’ त्या आजीबाईंनी नम्रपणे विचारले. 
त्या जोडप्याचा तो गबाळा अवतार बघून ती सेक्रेटरी थोडीशी नाराज झाली. तिला वाटले हे एक गरीब जोडपे आहे. एकतर भीक मागायला, म्हणजे डोनेशन मागायला आले असेल किंवा मुलाच्या फींमध्ये सवलत मागायला आले असेल. अशा लोकांना कसे टोलवायचे हे तिला चांगलेच ठाऊक होते. 
‘प्रेसिडेन्ट साहेब सध्या कामात आहेत! ते लगेच भेटू शकणार नाहीत!’ तिने उर्मटपणे सांगीतले. तिला वाटले तिच्या या उत्तराने ही ब्याद एकदाची टळेल. 
‘ठीक आहे! आम्ही वाट बघू! पण त्यांना भेटूनच परत जाऊ!’ त्या आजी नम्रपणे म्हणाल्या आणि ते जोडपे तेथे ठेवलेल्या सोफ्यावर जाऊन बसले. 
प्रेसिडेन्ट साहेब खरच बिझी असावेत. दोन चार वेळा ते केबिनच्या बाहेर आले. त्यांनी ऊंची सूट घातला होता, पायात चकचकीत बूट होते, चेहेर्याहवर अधिकाराचा रुबाब होता. त्यांनी त्या म्हातार्याि जोडप्याकडे पाहिले न पाहिल्यासारखे केले पण त्यांची काही दखल घेतली नाही. बघता बघता दिवस संपायला आला. संध्याकाळ व्हायची वेळ आली. तरी सुद्धा ते वृद्ध जोडपे बसूनच होते. शेवटी त्या सेक्रेटरीलाच दया आली असावी. 
‘ते वृद्ध जोडपे सकाळपासून तुम्हाला भेटायची वाट बघते आहे. तुम्ही त्यांना पाच मिनीटे तरी भेटावेत’ सेक्रेटरीने प्रेसिडेन्टला सांगीतले.
 प्रेसिडेन्टला घरी जयची घाई होती तरी पण केवळ पाच मिनिटेच भेटायला ते एकदाचे तयार झाले!
‘काय काम आहे?’ 
प्रेसिडेन्ट साहेब केबिनच्या बाहेर आले आणि त्या वृद्ध जोडप्याला विचारू लागले. चेहेर्यासवर बर्यानपैकी नाराजी हेतीच.
‘हे पहा! 
आमचा एकुलता एक मुलगा काही वर्षांपूर्वी या विद्यापिठाचा स्टुडन्ट होता. आता दुर्दैवाने तो नाही. विद्यापिठाच्या आवारात त्याचे एखादे स्मारक असावे असे आम्हाला वाटते. म्हणून आम्ही तुम्हाला भेटायला आलो!’ ती वृद्ध महिला नम्रपणे म्हणाली
‘स्मारक ?
 कसले स्मारक? 
म्हणजे तुम्हाला ईथे त्याचा पुळा वगैरे उभारायचा आहे काय? ते शक्य नाही.  आम्ही जर मृत पावलेल्या प्रत्येक माजी विद्यार्थ्याचा पुतळा येथे उभारू लागलो तर आमच्या युनिव्हर्सिटिचे स्मशान व्हायला वेळ लागणार नाही!’ प्रेसिडेन्ट साहेब काहिश्या वैतागानेच म्हणाले. 
‘नाही नाही! 
तसे नाही!’ 
त्या आजीबाई परत बोलू लागल्या, ‘आम्हाला येथे त्याचा पुतळा वगैरे उभारायचा नाही. त्याचे स्मारक म्हणून तुमच्या विद्यापीठाला एखादी चांगली ईमारत वगैरे बांधुन देण्याचा विचार आहे!’ 
त्या आजीबाईंच्या चुरगळलेल्या, मळक्या कपड्यांकडे बघून प्रेसिडेन्ट साहेबांना हसूच आले.’ ईमारत? ईमारत बांधायला किती पैसे लागतात ठाऊक आहे का? तुम्हाला म्हणून सांगतो. या विद्यापिठाच्या कॅम्पसमधील ईमारती बांधायला आम्हाला 75 लाख डॉलर्स लागले!’ प्रेसिडेन्ट साहेब सांगत असतातना या जोडप्याच्या खिशात 75 डॉलर्स तरी असतील की नाही याची त्यांना खात्री वाटत नसावी असा त्यांचा चेहेरा होता. 
‘युनिव्हर्सिटी काढायला एवढेच पैसे लागतात?’ त्या आजीबाई हळूच त्या म्हातारबुवांच्या कानात कुजबुजल्या. प्रेसिडेन्ट साहेबांचे आभार मानून मिस्टर आणि मिसेस लेलॅन्ड स्टॅनफोर्ड नावाचे हे वृद्ध जोडपे तेथून बाहेर पाडले. पुढे ते कॅलिफोर्निया राज्यातील पालो आल्टो या गावी आले आणि स्वतःच्या मुलाच्या नावाने युनिव्हर्सिटी चालू केली. हीच आहे जगप्रसिद्ध 
स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटी!
आज स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटी ही जगातील नंबर एकची युनिव्हर्सिटी म्हणून ओळखली जाते. 8180 एकर जमीनीवर या युनिव्हरसिटिचा पसारा पसरला आहे. या युविव्हर्सिटिचे वार्षिक बजेट भारत सरकारच्या वार्षिक बजेटच्या तिपटीहून जास्त असते. जगात सगळ्यात जास्त ‘नोबेल लॉरिएट्स’ (नोबेल पारितोषिक विजेते) या युनिव्हर्सिटीसाठी काम करतात. आज या युनिव्हिसिटीत 32 नोबेल लॉरियटस प्रोफेसर म्हणून काम करत आहेत. 
अनेक जणांना माणसाची पारख ही त्याच्या कपड्यांवरून किंवा बाह्य रुपावरून करायची सवय असते. पण अनेकदा ही सवय घातक ठरते. पॉश किंवा फॅशनेबल कपडे घालणारा माणूस हा खर्याण अर्थाने    श्रीमंत किंवा चांगल्या कॅरॅक्टरचा असतोच असे नाही. तसेच सामान्य कपडे घालणारा, सामान्यपणे रहाणारा माणुस हा गरीब, दळिद्री किंवा ‘लो कॅरॅक्टर’चा असतो असेही नाही. अनेक वेळा आपण माणसाच्या कपड्यांवरून किंवा बाह्य रुपावरून चुकीची पारख करतो आणि एखादा चांगला मित्र, हितचिंतक किंवा गि-हाईक हातचे घालवून बसतो. 
माणसाच्या कपड्यांवरून किंवा बाह्य रुपावरून त्याची पारख करायची घातक सवय, असल्यास, ती सोडून द्या! 
अर्थात असे करायचे की नाही हे तुमचे तुम्ही ठरवा!   
   
 --------------#satishmarji#-----------------
   Nobel mine ...

     An elderly couple came to meet the president of the world-famous Harvard University in the United States without an appointment.  The couple's attire was not only simple but also gaudy.  The frock worn by the old lady is very plain, crumpled and slightly wrinkled.  The suit worn by Mhatarbabu was sewn at home, cloudy, unbleached and not ironed.  The couple approached the secretary, who was sitting at the posh counter outside the president's cabin.
 ‘We only need a ten minute meeting with the President!  Will you get it? ’The grandmother asked politely.
          The secretary was a little upset to see the couple's baby avatar.  She thought it was a poor couple.  Either to beg, to donate, or to ask for a discount on the child's fees.  She knew exactly how to avoid such people.
 ‘Mr. President is at work now!  They won’t be able to meet right away! ’She said rudely.  She thought that this answer would help her to avoid it.
 ‘Okay!  We will wait!  But let’s meet them and go back! ’Said the grandmother politely and the couple sat down on the sofa.
 Mr. President must be really busy.  A couple of times they came out of the cabin.  He was wearing a high suit, shiny shoes on his feet, a ruby ​​of authority on his face.  He pretended not to see the elderly couple but did not notice them.  The day came to an end.  It was evening.  Even so, the elderly couple were still sitting.  In the end, the secretary must have felt sorry for him.
 ‘That old couple has been waiting to see you since morning.  You should meet them for at least five minutes, ”the secretary told the president.
  Although the president was in a hurry to win at home, he was only ready to meet for five minutes!
 ‘What’s up?’
 Mr. President came out of the cabin and began to ask the elderly couple.  There was only annoyance on his face.
 ‘Look at this!
 Our only son was a student of this university a few years back.  Now unfortunately he is not.  We think there should be a memorial to him on the campus.  So we’ve come to see you! ’Said the old lady politely
 ‘Monument?
  Which monument?
 I mean, do you want to build a bridge here?  That is not possible.  If we start erecting a statue of every deceased alumnus here, it will not take long for our university to become a crematorium! '
 ‘No no!
 Not so! '
 The grandmother said, "We don't want to erect a statue of him here.  The idea is to build a good building for your university as a memorial to him! '
 The President smiled as he looked at his grandmother's crumpled, dirty clothes. 'The building?  Do you know how much it costs to build a building?  I tell you so.  It cost us 75 7.5 million to build the building on the campus of this university! '
 ‘How much does it cost to get out of university?’ The grandmother whispered in the old man's ear.  The elderly couple, Mr. and Mrs. Leland Stanford, got out of there, thanking the President.  He later moved to Palo Alto, California, and started a university in his own son's name.  This is the world famous
 Stanford University!
 Today, Stanford University is known as the number one university in the world.  The university is spread over 8180 acres of land.  The annual budget of this university is more than three times the annual budget of the Government of India.  Most of the world's Nobel laureates work for this university.  Today, 32 Nobel Laureates are professors at the university.
 Many people have a habit of judging a man by his clothes or appearance.  But often this habit becomes dangerous.  A person who wears posh or fashionable clothes is not necessarily rich or has a good character.  Also, a person who wears normal clothes and lives normally is not poor, destitute or of low character.  Many times we misjudge a man's clothes or appearance, and a good friend, well-wisher, or gi-hiker sits on his hands and knees.
 The deadly habit of judging a man by his clothes or appearance, if any, give it up!
 Of course, it's up to you to decide! 


-------------#satishmarji#-------------------

Comments

Popular Posts