# Sonam Wangchuk


     बॉलीवुडने बनविलेल्या सर्वोत्कृष्ट चित्रपटांपैकी एक म्हणजे ‘थ्री इडियट’. ह्यातील आधीचा रँचो व नंतर शांततेत कश्मीरमधील विद्यार्थी मित्रांसाठी,अत्याधुनिक प्रयोगशाळेपेक्षा जराही कमी नसलेली शाळा चालवणाऱ्या फुंगसुक वांगडुची सारी दुनीया फॅन झाली. सर्वांनाच प्रश्न पड़त होता की असे अजब व्यक्तिमत्व खरच असेल का? की ते कल्पनेचा एक उत्कृष्ट नमुना असेल? चला तर ओळख करून घेऊयात real life फुंगसुक वांगडु अर्थात सोनम वांगचुक ह्यांची.लेह जिल्ह्यात जन्मलेल्या वांगचुक यांना वयाच्या 9 व्या वर्षापर्यंत शाळेची सोय नसल्याने शिक्षण घेता आले नव्हते. पुढे रिजनल कॉलेज, श्रीनगरमधुन मॅकेनिकल इंजिनीरिंग पदवी घेतली व शिक्षणाची अवस्था व दर्जा बघुन शिक्षण क्षेत्रात काम करण्यासाठी स्थानीक मुलांना शिकवणे सुरु केले. Student’s Educational and Cultural Movement of Ladakh (SECMOL)ही परकिय शिक्षणपद्धतीच्या आक्रमणाचे बळी ठरलेल्या त्यांच्या मित्रांनी व त्यांनी मिळून एक संघटना काढली.


शिक्षणक्षेत्रात सुधारणा घडवून आणण्याकरीता लेहपासून 13 km वर फेय ला मुलांसाठी शाळा सुरु केली. आज येथे बोर्ड परीक्षा नापास झालेल्या 60-100 मुलांना शिकवले जाते. ह्या शाळेत स्वत:चे डोके चालवा आणि शक्य तेवढे नवीन शोध लावा ह्या मानसिकतेसह इथे मार्गदर्शन केले जाते. ही शाळा पूर्णपणे सौर उर्जेवर चालत असून स्वयंपाक, विद्युत ई.कोणत्याही कार्यासाठी जीवाश्म इंधनाचा वापर केला जात नाही. उणे 30 डिग्री तापमानातही ही वास्तु सौर उर्जेवर गरम राहते. मुलांना अभ्यासासोबत पशुपालन, शेती, अन्न पदार्थ बनवणे तसेच अतीतीव्र वातावरणात जगण्याचे धड़े दिले जातात.


 शिक्षण क्षेत्रात सुधारणा करत असतानाच पाण्याच्या समस्येकडे ह्या वैज्ञानिकाचे वेधले गेले. उन्हाळ्यात वितळलेले सरोवरातील पाणी हे हिवाळ्यात कालवे, नदी, ओढ़े यांमधुन वाहत राहते. जमिनही गोठुन टणक होते व तापमानही जास्त नसल्याने शेती होऊ शकत नाही. ग्रीष्म लागल्यावर मात्र लगेच पाण्याचा वापर वाढुन टंचाई जाणवायला लागते; ह्या दोहोंतच ग्रामीण लोक त्रस्त आणि व्यस्त झालेले असतात.

ह्या समस्येवर त्यांनी शोधलेला उपाय म्हणजे कोनच्या आकारात पाणी गोठवुन ठेवणे, ज्यामुळे कोेनच्या वरच्या भागातच फक्त थेट सुर्यकिरणे पडतील व बर्फ पायथ्याला गोठत राहील. 2013 मध्ये सोनम आणि विद्यार्थी ह्यांनी कुठलीही मशीन किंवा इलेक्ट्रिसिटी न वापरता जवळपास 3 किमी पाणी फक्त गुरुत्वाकर्षण सिद्धांत वापरून वाहून आणले, ज्यातुन 6 फूट उंचीच्या कोनमधून दिड लाख लीटर पाणी जमा झाले. पूर्ण सूर्यप्रकाश पडत असतांनाही पाणी वाहुन जात नव्हते तर कोन आता वितळणाऱ्या मेणबत्तिसारखा दिसत होता. ह्या यशस्वी प्रयोगाने ख़ुश होउन वांगचुक ह्यांनी 75 लाख रुपयांची वर्गणी गोळा केली, ज्यातुन 20 लाख लीटर पाणी 2014 च्या जून मध्ये लोकांना मिळाले.


सर्वाधिक खर्च पाणी वाहुन आणणाऱ्या पाईप्सचा होता. तरीही 1 लीटर पाणी मिलवण्याचा खर्च केवळ 0.025 रु. झाला होता. ह्या कोनाचा आकार बौद्धस्तूपा प्रमाणे असल्याने नाव ice stoop देण्यात आले. 30 मीटर उंचीचा हिमस्तुप हा दिड करोड़ लीटर पाणी देऊ शकतो ज्यातुन 50 हेक्टर जमिनीवर सिंचनाची सोय केली जाउ शकते. जागोजागी असे मोठाले स्तुप तयार करण्याचे काम लेहमध्ये सुरु झाले आहे. उंचीवरून वाहुन आणलेले पाणी पाइप मध्ये दबाव तयार करते जे आणखी उंच जाऊंन फवाऱ्या सारखे उड़ते व वजा 20 डिग्री तापमानामुळे गोठले जाते.

स्तूपचा आतील भाग हा इग्लूप्रमाणे दिसतो ज्यात आतुन प्लास्टिक कोटिंग असते. हा भाग म्हणजे नियंत्रण कक्ष असतो जिथुन पाण्याचा प्रवाह व पाईपची ऊंची ठरवता येते. एकदा कोन तयार झाला की हे स्तुप पर्यटकांना भाड्यानेही दिले जातात ज्याने आर्थिक पाठबळ स्थानिकांना मिळते. अनेक पुरस्कार, सत्कार, बक्षिसे मिळूनही त्यांची प्रसिद्धिपासुन दूर असणाऱ्या डोंगराळ भागात काम करण्याची इच्छा जराही घटली नाही किंबहुना ती नवीन योजना अंमलात आणुन आणखी वाढतच आहे.

 Himalayin institute of alternatives(HIAL) विद्यापीठ जे वांगचुक तयार करीत आहेत, त्यांच्या सर्वेक्षणानुसार 1996 ला 10 वीत नापास होणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या 95% होती जी दोन दशकानंतर 25% पर्यंत खाली आणली आहे. त्यांची योजना एक असे विद्यापीठ तयार करण्याची आहे जे बर्फाळ- पहाड़ी भागासाठी ‘ice स्तूप’ सारखे पर्याय शोधून कृषी, पर्यटन, शिक्षण व व्यापार ह्यांना मिळेल. भारतातच नव्हे तर परदेशातील अनेक समाजसेवक, वैज्ञानिक व शिक्षण क्षेत्रातील गणमान्य व्यक्तिंकरीता सोनम हे आदर्श बनले आहेत.

शिक्षण,संशोधन व समाजकार्य ह्यांसाठी आयुष्य वेचणाऱ्या ह्या अवलियाला थ्री इडियट मधील वाक्य तंतोतंत लागू पड़ते.

Success के नही, excellence के पीछे भागो; कामीयाबी खुद तुम्हारे पीछे आयेगी.


Boycott China 👇


'थ्री इडियट्स'मध्ये आमिर खानने प्रसिद्ध शिक्षण तज्ज्ञ सोनम वांगचुकची भूमिका साकारली होती. त्या चित्रपटात आमिर खानचे 'रॅन्चो' असे होते. खऱ्या अर्थान सोनम वांगचुकची या चित्रपटामुळेच सर्वसमान्यांमध्ये ओळख झाली होती. आता सोनम वांगचुक पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. आता त्यांनी थेट सध्या भारत आणि चीनमध्ये होणाऱ्या सीमा वादावरच आपली प्रतिक्रिया दिली आहे,  त्यांनी चीनशी झालेल्या तणावातून चीनला प्रत्युत्तर देण्याविषयी व्हिडीओ बनवला आहे. व्हिडिओ यूट्यूब पेजवर शेअर केला आहे. भारताला चीनविरोधातील युद्ध जिंकायचे असल्यास सर्वातं आधी चिनी वस्तूंवर बहिष्कार टाकला पाहिजे असं मत यांनी व्यक्त केलं आहे. 

 
-----------#satishmarji#------------------
    
English Translation :-


    One of the best films made by Bollywood is 'Three Idiots'.  The whole world became a fan of Fungsuk Wangdu, who ran a school that was no less than a state-of-the-art laboratory, first for Rancho and then for student friends in peaceful Kashmir.  Everyone was wondering if such a strange personality really existed.  Or would it be a masterpiece of imagination?  Let's get to know the real life of Fungsuk Wangdu i.e. Sonam Wangchuk.
 Wangchuk, who was born in Leh district, could not go to school until the age of nine due to lack of school facilities.  He later graduated from Regional College, Srinagar with a degree in Mechanical Engineering and started teaching local children to work in the field of education.  The Student's Educational and Cultural Movement of Ladakh (SECMOL) is an organization formed by his friends who were the victims of foreign invasions.
 Faye started a school for children 13 km from Leh to improve education.  Today 60-100 children who failed the board exam are taught here.  The school is guided by the mentality of running your own head and inventing as many new things as possible.  The school is run entirely on solar energy and does not use fossil fuels for cooking, electricity etc.  Even at minus 30 degrees Celsius, the building is heated by solar energy.  Along with studies, children are given lessons in animal husbandry, agriculture, food preparation and survival in extreme environments.
 While improving education, the scientist was drawn to the problem of water.  The water from the lake, which melts in summer, flows through canals, rivers and streams in winter.  The land also freezes and becomes hard and agriculture cannot be done as the temperature is not high.  As soon as summer arrives, however, water consumption increases and scarcity begins to be felt;  In both cases there is a complete digestive tract.

 The solution they came up with was to freeze water in the shape of a cone, so that only direct sunlight would fall on the top of the cone and the ice would freeze at the base.  In 2013, Sonam and Vidyarthi carried about 3 km of water without using any machine or electricity using only the principle of gravity, from which 1.5 lakh liters of water was collected from a 6-foot-high angle.  The water was not flowing even in full sunlight, but the angle now looked like a melting candle.  Pleased with the successful experiment, Wangchuk collected a subscription of Rs 75 lakh, of which 20 lakh liters of water was distributed to the people in June 2014.
    The highest cost was for water pipes.  However, the cost of getting 1 liter of water is only Rs 0.025.  Was done.  This corner was named ice stoop because of its shape like a Buddhist stupa.  The 30 meter high iceberg can provide 1.5 crore liters of water from which 50 hectares of land can be irrigated.  The construction of such large stupas has started in Leh.  The water carried from the height creates pressure in the pipe which goes higher and flies like a spray and freezes at a temperature of minus 20 degrees.
 The inside of the stupa looks like an igloo with a plastic coating on the inside.  This part is the control room from which the flow of water and the height of the pipe can be determined.  Once the angle is formed, these stupas are also rented out to tourists which gives financial support to the locals.  Despite receiving many awards, honors and prizes, his desire to work in the hilly areas far from his fame has not diminished at all.
         According to a survey conducted by the Himalayan Institute of Alternatives (HIAL) University, Wangchuk, the number of students failing 10th grade in 1996 was 95%, which has come down to 25% after two decades.  His plan is to build a university that will provide alternatives to the ice-mountains, such as the ‘ice stupa’, for agriculture, tourism, education and trade.  Sonam has become a role model not only in India but also abroad for many social workers, scientists and dignitaries in the field of education.
 The sentence in Three Idiots applies to this avaliya who sacrifices his life for education, research and social work.

 Run after excellence, not success;  Success will follow you.

Boycott China 👇
In 'Three Idiots', Aamir Khan played the role of renowned educationist Sonam Wangchuck.  That movie was Aamir Khan's 'Rancho'.  Sonam Wangchuck's true meaning was well known in the film.  Now Sonam Wangchuck is back in the spotlight.  Now that he is directly responding to the current border dispute between India and China, he has made a video of China responding to tensions with China.  The video is shared on the YouTube page.  "If India wants to win the war against China, it must first boycott Chinese goods," he said.


--------------#satishmarji#------------------

Comments

Popular Posts