# डॉ. जगदीशचंद्र बोस ( Dr. Jagadish Chandra Bose)
वनस्पतीशास्त्रभौतिकशास्त्र, जीव भौतिकशास्त्र या विज्ञानातल्या अभ्यास सर्वांसह बंगाली वाङ्मयाचा पहिला विज्ञान कथा लेखक, असे बहुआयामी व्यक्तिमत्व म्हणजे डॉ. जगदीशचंद्र बोस.
वनस्पतींनाही जीव आणि भावना असतात. याशिवाय, उष्णता, थंडी, प्रकाश, आवाज आणि अन्य विविध कारणांनी बहुतांशी बाह्य वातावरणामुळे उत्तेजित होऊन प्रतिसाद देण्याच्या क्षमता वनस्पती आणि प्राण्यांमध्ये समान असतात. हे सप्रयोग सिद्ध करणारे डॉ. जगदीशचंद्र बोस पहिले वनस्पतीशास्त्रज्ञ होते. स्वाभिमान, आत्मविश्वास आणि बुद्धिमत्तेला दिलेली आव्हानं त्यांनी कधीही सहन केली नाहीत. वनस्पती आणि प्राण्यांमधल्या समान प्रतिसादावरच्या प्रयोगाच्या सादरीकरणाच्या वेळी लंडनच्या रॉयल सोसायटीचं सभागृह अनेक संशोधक आणि शास्त्रज्ञांनी भरगच्च भरलेलं होतं. हा वनस्पतीशास्त्रातला अजब प्रयोग बघून संपूर्ण सभागृह आवाक् झालं आणि सारं सभागृह टाळ्यांच्या कडकडाटानं निनादत राहिलं पण हे एवढवरच संपलं नाही, तर काही संशोधकांनी त्यावर अनेक आक्षेप घेतल्यावर त्याच आत्मविश्वासाच्या जोरावर बुद्धिमत्तेच्या तेजानं आणि वैज्ञानिक कसोट्यांवर डॉ. जगदीशचंद्र बोस त्यांना पुरून उरले.
ब्रिटिशकालीन बंगाल प्रांतातल्या (आताचा बांग्ला देश) मुन्सिगंज (विक्रमपूर) इथं 30 नोव्हेंबर 1858 रोजी त्यांचा जन्म कायस्थ कुटुंबात झाला. वडील भगवानचंद्र बोस ब्रम्हो समाजाच्या मान्यवर नेतेगणांपैकी एक. फरिदपूर, वर्धमान आणि अन्य ठिकाणी ते उपन्यायाधीश आणि सहआयुक्त होते. इंग्रजी शिक्षण घेण्यापूर्वी प्रत्येकाला स्वतःची मातृभाषा आणि समाजाची जाण अवगत असलीच पाहिजे म्हणून जगदीशचंद्रांचं प्रारंभीचं शिक्षण वडीलांनी देशीभाषांमधूनच केलं. नंतर ते हरे स्कूल (1869) आणि कलकत्ता विद्यापाठीची प्रवेश परीक्षा पास करून सेंट झेव्हिअर कॉलेजमध्ये दाखल झाले. तिथं फादर जेसूट यांनी त्यांच्यामध्ये निसर्गविज्ञानाची गोडी निर्माण केली. इथून पदवीधर झाल्यावर त्यांना आय.सी.एस. (आताचे आयएएस) करण्यासाठी लंडनला जायचं होतं, पण वडिलांनी त्यास स्पष्ट नकार दिला. त्यांना आपला मुलगा विद्वान व्हावा, असं वाटत होतं. त्यानंतर ते लंडन विद्यापीठात वैद्यक शिक्षणासाठी गेले, पण प्रकृती अस्वास्थ्यामुळे मायदेशी परतले. त्यांचे जावई आणि भारताचे पहिले रँग्लर आनंदमोहन बोस यांच्या शिफारशीवरून त्यांची निसर्ग विज्ञानाच्या अभ्यासासाठी केंब्रिज विद्यापीठाच्या खिस्त कॉलेजमध्ये निवड झाली. याच विषयात बी.ए. झाल्यावर लंडन विद्यापीठाच्या लंडन कॉलेजमधून बी.एस्सी. (1884) आणि 1896 मध्ये तिथंच डी.एस्सी. झाले. लॉर्ड रेलिग, मायकेल फॉस्टर, जेम्स डेवर, फ्रांसिस बॉलफोर आणि सिडने विन्स हे त्यांचे प्राध्यापक होते. यातले काही नोबेल पुरस्कार विजेते होते, हे विशेष. नोबेल पुरस्कार विजेते लॉर्ड सेटिंग यांच्या मार्गदर्शनाखालीच त्यांनी संशोधन केले. जगदीशचंद्र केंब्रिजमध्ये असतानाच प्रफुल्लचंद्र राय एडिनबर्गला शिकत होते. लंडनमध्ये त्यांची भेट झाल्यावर पुढे ते घनिष्ट मित्र झाले. हेच प्रफुल्लचंद्र राय नंतर रसायनशास्त्रातले प्रसिद्ध संशोधक झाले. स्त्रीमुक्ती चळवळीतल्या प्रसिद्ध कार्यकर्ता अबाला बोस यांच्यासोबत जगदीशचंद्र विवाहबद्ध झाले. त्यांच्यावर भगिनी निवेदिता यांच्या विचारांचा पगडा होता. इतकंच नाही, तर त्या जगदीशचंद्रांना आर्थिक मदतीसह त्यांचं ग्रंथलेखन लवकर पूर्ण व्हावं म्हणून हस्तलिखितांच्या संपादनात मदतही करायच्या. केंब्रिजमधलं शिक्षण आटोपून परतल्यावर कलकत्ता विद्यापीठाच्या प्रेसिडेंसी कॉलेजमध्ये ते भौतिकशास्त्राचे प्राध्यापक झाले, पण साधनांचे अपुरेपण आणि वंशविद्वेषामुळे त्यांच्याच समकक्ष ब्रिटिश सहाध्यायांपेक्षा मिळणाऱ्या कमी वेतनाचा निषेध म्हणून या स्वाभिमानी माणसानं तब्बल तीन वर्ष वेतन न घेताच स्वतःला संशोधनात गाडून घेतलं. नंतर मात्र याच कॉलेजनं त्यांची रीतसर कायमस्वरूपी नेमणूक करून त्यांना सारं वेतन थकबाकीसह दिलं. मात्र, त्यानंतर ही नोकरी सोडून त्यांनी कलकत्त्यातच स्वतःची बोस इन्स्टिट्यूट उभारली. रिमोट वायरलेस सिग्नलिंगमध्ये विशेष संशोधन करून सेमिकंडक्टरमध्ये ते वापरून रेडिओ सिग्नल्स मिलीमीटरमध्ये मोजणारे ते पहिले संशोधक ठरले, पण त्यांनी या शोधाचं पेटेंट घेऊन व्यावसायिक फायदा न घेता त्यात अधिक सुधारणा करण्यासाठी सर्वसामान्यांसाठी हे संशोधन खुलं केलं. वनस्पतींच्या रचनांमध्ये बरंच संशोधन करून त्यांच्या वाढ मापनासाठी लावलेला प्रसिद्ध क्रिस्कोग्राफीचा शोध असाच. या शोधातूनच त्यांनी बहुतांशी बाह्यवातावरणामुळे आणि विविध विषयुक्त आणि गुंगी आणणाऱ्याऔषधांनीही उत्तेजित होऊन प्रतिसाद देण्याच्या क्षमता वनस्पती आणि प्राण्यांमध्ये समान असतात, हे सप्रयोग जगापुढ् स्पष्ट केलं. या शोधाच्या सन्मानार्थ चंद्रावरच्या विवराला त्यांचं नाव देण्यात आलं आणि वनस्पतीशास्त्रात रेडिओ आणि सूक्ष्मलहरींच्या प्रयोगशील शास्त्रातली भारतीय उपखंडातील ही पहिली शोधकर्ता व्यक्ती. आयईईई या संस्थेनं तर त्यांना रेडिओ सायन्स मधल्या पितामाहा पैकी एक मानलेलं आहे. 1895 मध्ये त्यांचा पहिला शोधनिबंध एशियाटिक सोसायटी ऑफ बंगालने, तर दुसरा शोधनिबंध त्याच काळत रॉयल सोसायटी ऑफ लंडन प्रकाशित केला. इलेक्ट्रोमॅग्नेटिक लहरींची मिलीमीटरमध्ये लांबी किती, हा जीवभौतिकशास्त्रातला पहिला शोध त्यांनी लावला. इलेक्ट्रिकल आणि संगणक अभियांत्रिकीमध्ये मिलीमीटर बैंड रेडिओचा प्रयोग मैलाचा दगड मानला जातो. 1896 मध्ये त्यांची लंडनमध्ये भाषणमाला आयोजित करण्यात आलेली होती. विज्ञानाच्या अनेक प्रांतात गती असली, तरी त्यांचे संशोधन प्रामुख्यानं निसर्गविज्ञानाचाच वेध घेत राहिलं.
'रिस्पांस इन द लिव्हिंग अँड नॉनलिव्हिंग (1902)', 'द नर्व्हस मेकॅनिझम ऑफ प्लांट्स (1926)' ही त्यांची गाजलेली पुस्तके. 'पलतक तुफान 1902)' हा 1921 मध्ये प्रसिद्ध झालेला बंगालीतला पहिला विज्ञान कथासंग्रह त्याच्या. नंतर बोधिसत्व चटोपाध्याय यांनी त्याचं इंग्रजीत भाषांतर केलं. कंप्यानियन ऑफ द ऑर्डर ऑफ द इंडियन एम्पायर (सीआयई) (1903), कंप्यानियन ऑफ द स्टार ऑफ इंडिया (1911), नाईट बॅचलर (1917), या सन्मानांसह व्हिएन्ना अकादमी ऑफ सायन्सेस (1928), चौथ्या इंडियन सायन्स काँग्रेसचे अध्यक्ष (1927), फिनिश सोसायटी ऑफ सायन्स (1929), कमिटी फॉर इंटेलेक्च्युअल्सच्या लिग ऑफ नेशन्सचे 1924 ते 1931 पर्यंत सदस्य, भारताच्या राष्ट्रीय विज्ञान संस्थेचे संस्थापक सदस्य, 2009 मध्ये इंडियन बोटॅनिकल गार्डन त्याचं नाव देण्यात आलं. हा भारताचा वैज्ञानिक सुपुत्र 23 नोव्हेंबर 1937 रोजी तत्कालीन बंगाल प्रातांतल्या गिरीध इथं (आता झारखंड) निधन पावला.
⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️
या ब्लॉग ला Subscribe करा आणि तुमचे मित्र परिवारासोबत शेअर व तुम्हाला आवडल्यास कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करा.🙏💐
-------------#सतिश मर्जी #--------------------
English Translation:-
The first science fiction writer of Bengali literature with all his studies in the sciences of botany, physics and biophysics, he is a multi-faceted personality. Jagadish Chandra Bose.
Plants also have life and emotions. In addition, plants and animals have similar abilities to respond to heat, cold, light, noise, and a variety of other factors, mostly stimulated by the external environment. Dr. who proved this experiment. Jagadish Chandra Bose was the first botanist. He never faced the challenges of self-esteem, confidence and intelligence. The auditorium of the Royal Society of London was packed with researchers and scientists at the time of the presentation of the experiment on the same response between plants and animals. The whole hall was abuzz with applause after seeing this bizarre experiment in botany, and the whole hall resounded with applause, but it did not end there. Jagadish Chandra Bose buried them.
He was born on 30 November 1858 in Munshiganj (Vikrampur) in the British Bengal Province (now Bangladesh) to a Kayastha family. Father Bhagwan Chandra Bose is one of the prominent leaders of Brahmo Samaj. He was the Deputy Judge and Joint Commissioner in Faridpur, Vardhman and other places. Before learning English, everyone must be aware of their own mother tongue and society, so Jagadish Chandra's early education was done by his father in the vernacular. He later passed the entrance examination of Hare School (1869) and Calcutta University and entered St. Xavier's College. There, Father Jesuit instilled in them a love of nature. After graduating from here, he joined ICS. (Now IAS) wanted to go to London, but my father flatly refused. He wanted his son to be a scholar. He then went on to study medicine at the University of London, but returned home due to health problems. On the recommendation of his son-in-law and India's first wrestler Anand Mohan Bose, he was selected to study natural sciences at Cambridge University's Christian College. B.A. in the same subject. After completing his B.Sc. from London College, University of London. (1884) and in 1896 the same D.Sc. Done. His professors were Lord Releg, Michael Foster, James Dever, Francis Balfour and Sidney Vince. Some of these were Nobel Prize winners, in particular. He did research under the guidance of Nobel Laureate Lord Setting. While Jagadish Chandra was in Cambridge, Prafulla Chandra Rai was studying in Edinburgh. They later became close friends when they met in London. It was Prafulla Chandra Rai who later became a famous researcher in chemistry. Jagadish Chandra was married to Abala Bose, a well-known activist of the women's liberation movement. Sister Nivedita's thoughts were on him. Not only that, but he also wanted to help Jagadish Chandra in editing the manuscripts so that his bibliography could be completed soon with financial help. After completing his education at Cambridge, he became a professor of physics at Presidency College, University of Calcutta, but due to lack of resources and racism, the self-respecting man immersed himself in research for three years without receiving a salary compared to his British counterparts. Later, however, the same college appointed him permanently and paid him the entire salary with arrears. However, he quit his job and set up his own Bose Institute in Calcutta. He became the first researcher to specialize in remote wireless signaling and to measure radio signals in millimeters using them in semiconductors, but he patented this invention and opened the research to the public to further improve it without taking commercial advantage. Much research has been done on the composition of plants to measure their growth. From this discovery, he explained to the world that plants and animals have the same ability to respond to stimuli, mostly due to the external environment and also to various toxic and numbing drugs. The lunar detail was named in honor of this discovery, and he was the first researcher in the Indian subcontinent to experiment with radio and microscopy in botany. IEEE considers him to be one of the fathers of radio science. His first dissertation was published by the Asiatic Society of Bengal in 1895, while his second dissertation was published by the Royal Society of London at the same time. The first discovery in biophysics was the length of electromagnetic waves in millimeters. The experiment of millimeter band radio is considered a milestone in electrical and computer engineering. In 1896 his speech was held in London. Although there was momentum in many fields of science, his research continued to focus mainly on natural sciences.
His bestselling books are Response in the Living and Nonliving (1902), and The Nervous Mechanism of Plants (1926). 'Palatak Tufan 1902) is the first collection of science fiction in Bengali published in 1921. Later Bodhisattva Chattopadhyaya translated it into English. Companion of the Order of the Indian Empire (CIE) (1903), Companion of the Star of India (1911), Knight Bachelor (1917), Vienna Academy of Sciences (1928), President of the 4th Indian Science Congress (1927), He was a member of the Finnish Society of Science (1929), the League of Nations of the Committee for Intellectuals from 1924 to 1931, a founding member of the National Institute of Science of India, and was named the Indian Botanical Garden in 2009. He died on 23 November 1937 at Giridh (now Jharkhand) in the then state of Bengal.
⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️
Subscribe to this blog and share with your friends and family and comment in the comment box if you like.,🙏💐💐
----------#satishmarji#----------------------
Good information
ReplyDeleteThank you
Delete👌👌👌
ReplyDeleteखुप छान भावा...
ReplyDelete👌👍
ReplyDelete