# जागतिक लोकसंख्या दिन (World Population Day)

पृथ्वीवर सजीवांचा जन्म आणि विकास झाल्यापासून अलीकडील पाचशे वर्षांपूर्वीपर्यंत निसर्गाचा समतोल राखला गेला, कारण तिथे मानवासारखा निसर्गद्रोही प्राणी जन्मला नव्हता. परंतु मानवाच्या प्रगतीच्या काळापासून लोकसंख्येचे निसर्गाचे गणित चुकले. अन्नसाखळी तुटली. औद्योगिक क्रांतीमुळे शहरीकरण झाले. विज्ञान-तंत्रज्ञानामुळे आयुष्यमान वाढले. सुखसुविधा वाढल्या आणि लोकसंख्या झपाट्याने वाढली. या वाढीचा फटका बसला तो वनांना, वन्यजीवाना आणि नैसर्गिक संसाधनांना. आजही प्रचंड लोकसंख्येला जगण्यासाठी प्रचंड प्रमाणात जंगलतोड सुरू आहे.पृथ्वीवर सजीवांचा जन्म आणि विकास झाल्यापासून अलीकडील पाचशे वर्षांपूर्वीपर्यंत निसर्गाचा समतोल राखला गेला, कारण तिथे मानवासारखा निसर्गद्रोही प्राणी जन्मला नव्हता. परंतु मानवाच्या प्रगतीच्या काळापासून लोकसंख्येचे निसर्गाचे गणित चुकले. अन्नसाखळी तुटली. औद्योगिक क्रांतीमुळे शहरीकरण झाले. विज्ञान-तंत्रज्ञानामुळे आयुष्यमान वाढले. सुखसुविधा वाढल्या आणि लोकसंख्या झपाट्याने वाढली. या वाढीचा फटका बसला तो वनांना, वन्यजीवाना आणि नैसर्गिक संसाधनांना. आजही प्रचंड लोकसंख्येला जगण्यासाठी प्रचंड प्रमाणात जंगलतोड सुरू आहे. अनेक सजीव प्रजाती नष्ट होत आहेत. जल, जमीन कमी पडू लागली आहे. प्रदूषणाचे, हवामान बदलाचे, नैसर्गिक आपत्तीचे संकट ओढवले असून या लोकसंख्येच्या ओझ्याखाली स्वत: मानवच दबून गुदमरतोय. विज्ञान-तंत्रज्ञान संशोधनामुळे आता कामगार, रोजगार कमी झाला असून बेरोजगारी वाढली आहे. त्यामुळे संकट पुन्हा मोठे होऊ पहात आहे. लोकसंख्या नियंत्रण करण्यासाठी त्वरित पावले उचलली तरच भावी संकट कमी होईल. टळणार मात्र नाही.


लोकसंख्येचा आढावा

पाच हजार वर्षांपूर्वी केवळ लाखांच्या जवळ असलेली जगाची लोकसंख्या १९१५पासून झपाट्याने वाढू लागली. २०२० मध्ये आजच्या दिवशी सात अब्ज एकाहत्तर कोटींवर (७,७१५,४२५,५००) पोहोचली असून त्यामुळे पर्यावरणासोबतच अनेक मानवी समस्या वाढल्या आहेत. चीनची लोकसंख्या १ अब्ज ४२ कोटी १ लाख १४ हजार ३६० आहे. भारताची लोकसंख्या १ अब्ज ३६ कोटी ८८ लाख ९१ हजार ३५० इतकी आहे. भारतानंतर अमेरिका (३२ कोटी ९१ लाख १७ हजार ४३५), इंडोनेशिया (२६ कोटी ९५ लाख ६५ हजार १९८) आणि ब्राझील (२१ कोटी २४ लाख ८ हजार ६५५) या देशांचा क्रमांक येतो. महाराष्ट्राची लोकसंख्या १२ कोटींवर गेली आहे. दरवर्षी सात कोटींच्या वर मूल जन्मतात आणि दोन कोटी मृत्यू पावतात. म्हणजे जागतिक लोकसंख्येत दरवर्षी चार कोटी लोकसंख्येची भर पडते. पंधराव्या शतकापर्यंत जगाची लोकसंख्या क्रमाने वाढत गेली. परंतु सोळाव्या शतकानंतर ते विसाव्या शतकापर्यंत तिचा आलेख अगदी सरळ वर गेला. जागतिक पातळीवर प्रयत्न झाल्यामुळे तिची घोडदौड आता किंचित थांबली असली तरीही, आताची लोकसंख्या हीच धोक्याच्या पातळीवर गेली आहे. ती पुन्हा वाढतच जाणार आहे. आजही दरवर्षीचा वाढीचा दर १.०९ इतका आहे. हा दर असाच ४० वर्षे वाढत राहिला तर २०३५मध्ये लोकसंख्या ९ अब्ज, २०५५मध्ये १० अब्ज आणि २०९०मध्ये ११ अब्ज होईल आणि तेव्हा जगातील सर्व नैसर्गिक संसाधने संपली असतील. आताच्या प्रचंड संख्येमुळे पिण्याचे पाणी, खायला अन्न आणि सुविधा कशा पुरवायच्या असे अनेक प्रश्न देशासमोर राहतील. एकाच जातीची इतकी प्रचंड संख्या जैवविविधतेसाठी धोकादायक असतेच, परंतु स्वजातीसाठीसुद्धा धोकादायक असते हे निसर्गाचे सूत्र आहे आणि तसे घडतही आहे. म्हणून आताच ‘एक कुटुंब एक मूल’ हे सूत्र अवलंबावे लागेल. तरच लोकसंख्या नियंत्रणात येऊ शकेल.
भारताची स्थिती गंभीर
जगाच्या लोकसंख्येत भारताच्या लोकसंख्येचे प्रमाण १७.७४ टक्के आहे. त्यात ७० कोटी ३१ लाख ७१ हजार १५९ पुरुष तर ६५ कोटी ८७ लाख २ हजार १८३ स्त्रियांचा समावेश आहे. दरवर्षी २ कोटी ६९ लाख ३२ हजार ५८६ जन्म तर ९७ लाख ७८ हजार ०७३ जणांचा मृत्यू होतो. हे प्रमाण बघता लोकसंख्या अजून वाढत राहणार आहे. ही लोकसंख्या ३२ लाख ८७ हजार २६० वर्गकिलोमीटर इतक्या क्षेत्रफळावर वास करीत आहे. त्याची घनता ४६० दरकिमी इतकी आहे. भारतातील सर्वात मोठे आणि जास्त लोकसंख्या असेले राज्य उत्तर प्रदेश हे असून त्याची आजची लोकसंख्या २१ कोटी ८१ लाख ५८ हजार २६७ (१७ टक्के) म्हणजे ब्राझील या देशाइतकी आहे. महाराष्ट्र देशात दुसऱ्या क्रमांकावर आहे एकट्या मुंबई शहराची लोकसंख्या १२.५ कोटी असून दिल्लीची लोकसंख्या दुसऱ्या क्रमांकावर आहे. जागेचे क्षेत्रफळ कमी आणि लोकसंख्या जास्त अशी असमानता असेल तर त्याचा ताण सर्व नैसर्गिक संसाधने, राहणीमान आणि देशाच्या एकूणच प्रगतीवर पडतो आणि देश मागे जातो.
पर्यावरणाच्या गंभीर समस्या
निसर्ग नियमाप्रमाणे सजीवांची लोकसंख्या नियंत्रणात येत असते. अन्नसाखळीच्या माध्यमाने निसर्गाचे संतुलन टिकविण्यासाठी शाकाहारी प्राणी किती असावे, मांसाहारी प्राणी किती असावे आणि कोणते वृक्ष असावे हेसुद्धा निसर्ग नियंत्रित करीत असतो. याच अनुषंगाने मांसाहारी प्राणी कमी आणि त्यांचे अन्न असलेले शाकाहारी जीव जास्त संखेने जीवाना जन्म घालतात. माणसाचा आता नैसर्गिक शत्रू नसल्याने त्याच्या जन्मदरावर नियंत्रण ठेवायला कुणीही नाही आणि म्हणून मानव या प्राण्याची संख्या झपाट्याने वाढली आणि वाढत आहे. तंत्रज्ञान, वैद्यकशास्त्र विकसित झाल्यामुळे मानवाचे आयुष्यमान वाढले आणि मृत्युदर कमी झाला आहे.
लोकसंखेला अन्न, वस्त्र, निवारा मिळण्यासाठी नैसर्गिक साधनांचा मोठा वापर होऊ लागला. औद्योगिकरण, खाणी, शेती, शहरे, धरणे, रस्ते, रेल्वे इत्यादी अनेक उपयोगासाठी मोठ्या प्रमाणावर जंगलतोड झाली. आजही याच कारणासाठी सुंदर वनांचा आणि वन्यजीवांचा ऱ्हास होत आहे. ही समस्या एवढ्यावरच थांबली नसून प्रदूषण, तापमानवाढ, हवामान बदल आणि नैसर्गिक आपत्तीच्या रूपाने आपल्या जीवावर उठली आहे. ज्या वनांनी आपल्याला जन्म दिला, ज्या पर्यावरणाने आपल्याला जगविले, ज्या वन्यजीवांनी आपल्याला सहजीवनात साथ दिली, त्याचाच आपन विनाश करीत आहोत, ही साधी बाब बुद्धिमान मानवाला कळू नये! आजही कळत नाही. आज आपण मरणाच्या उंबरठ्यावर पोहोचलो तेव्हा कुठे ‘झाडे लावा-झाडे जगवा’ म्हणतो आहोत. दुसरीकडे वाढत चाललेली लोकासंख्या जंगले नष्ट करीत आहेत. दरवर्षी शेतीसाठी, वस्तीसाठी देशात हजारो हेक्टर जंगल तोडले जाते. वाढत्या लोकसंख्येसाठी, उद्योगासाठी नद्या, नाले आणि भूजल, अन्न आणि निवारा कमी पडू लागला आहे. नैसर्गिक साधनसंपत्ती नष्ट होऊ लागली आहे. लोकसंख्येमुळे एकूणच निसर्गाचा समतोल बिघडू लागला आहे.
जीवनमान खालावले
लोकसंख्या वाढीमुळे लोक रोजगाराच्या शोधात शहरांकडे वळले. एकीकडे बेरोजगारी वाढली. नोकरीच्या संधी कमी झाल्या. झोपडपट्टी वाढली. गरिबी वाढली. आरोग्याच्या सोयी अपुऱ्या पडू लागल्या. रोगराई वाढली. शैक्षणिकदृष्ट्या कमी पडून जीवनमान खालावले. लोकांच्या वाढत्या लोंढ्यामुळे शहरे फुगू लागली. प्रदूषण वाढले. पिण्याच्या पाण्याची कमतरता भासू लागली. म्हणजे काय तर केवळ लोकसंख्या वाढ ही पर्यावरण, प्रदूषण, नैसर्गिक साधनसंपत्ती आणि मानवी अधोगतीला कारणीभूत ठरत आहे. तंत्रज्ञान विकासामुळे काही लोकांना नक्कीच फायदा झाला, परंतु यामुळे बेरोजगारी, गरिबी वाढली. पर्यावरण, प्रदूषच्या समस्या निर्माण झाल्या. देशातील वाढत्या लोकसंख्येला काम, नोकरी पाहिजे, परंतु नवनव्या तंत्रज्ञान विकासामुळे मानसांची जागा यंत्रांनी घेतली. खाणीत एक मशीन शंभर लोकांची, ऑफिसमध्ये कम्प्युटर दहा लोकांचे काम करू लागले. मोबाइल, कॅमेरे आणि नवनवीन यंत्रणा आल्यामुळे कामगार, मजुरांजी गरज कमी झाली.
भारतासारख्या बहुलोकसंख्या असलेल्या देशात मानवरूपी ऊर्जेचा वापर व्हायला पाहिजे होता. त्यामुळे बेरोजगारी कमी झाली असती. जीवनमान उंचावले असते, परंतु आपण या पैलूकडे लक्ष दिले नाही. हीच वाढती लोकसंख्या आज जगण्यासाठी शेतीसाठी, राहण्यासाठी, इंधनासाठी जंगल तोडून, वन्यजीवांना मारून उदरनिर्वाह करीत आहे. सरकार या वाढत्या लोकसंख्येला सोयी पुरविण्यासाठी जंगले तोडून रस्ते, रेल्वे, धरणे ,कालवे, वीजवाहिन्या, उद्योग उभारत आहे. या सर्व अनैसर्गिक विकासकामांमुळे सर्व नैसर्गिक संसाधने नष्ट होत आहेत. आजच आपण लोकसंखेच्या भस्मासुराला आवळले नाही तर उद्या हीच लोकसंख्या आपला आणि निसर्गाचा विनाश करेल. पर्यावरण आणि निसर्ग टिकवायचा असेल तर लोकसंख्या कमी करणे हाच यावर उपाय आहे. सर्वसामान्य नागरिकांसाठी लोकशिक्षण, प्रलोभन आणि ‘एक कुटुंब एक मूल’ हे समीकरण ठेवल्यासच लोकसंख्या कमी होऊ शकेल. त्यासाठी कडक कायदे, विविध योजनांची गरज आहे. याहून महत्त्वाचे म्हणजे सरकारच्या इच्छाशक्तीची गरज आहे.

--------------#satishmarji#----------------
 
English Translation :-

From the birth and evolution of living things on earth until the last five hundred years, the balance of nature was maintained, because there was no anti-nature animal like human born.  But since the time of human progress, the mathematics of the nature of population has gone wrong.  The food chain is broken.  The Industrial Revolution led to urbanization.  Science and technology have increased life expectancy.  Amenities increased and the population grew rapidly.  This growth has hit forests, wildlife and natural resources.  Even today, deforestation is rampant for the survival of a large population. From the birth and evolution of living things on earth until recently, five hundred years ago, nature was kept in balance, because no anti-nature creatures like humans were born there.  But since the time of human progress, the mathematics of the nature of population has gone wrong.  The food chain is broken.  The Industrial Revolution led to urbanization.  Science and technology have increased life expectancy.  Amenities increased and the population grew rapidly.  This growth has hit forests, wildlife and natural resources.  Even today, large-scale deforestation continues to support a large population.  Many living species are becoming extinct.  Water and land are declining.  Crisis of pollution, climate change, natural calamities has taken its toll and human beings are suffocating under the burden of this population.  Science-technology research has now reduced labor, employment and increased unemployment.  So the crisis is looking to get bigger again.  Future crises will only be reduced if immediate steps are taken to control the population.  But it will not be avoided.

 Population Review
 The world's population, which was only close to one million five thousand years ago, has been growing rapidly since 1915.  Today, in 2020, it has reached seven billion seventy one crores (7,715,425,500), which has increased many human problems along with the environment.  China's population is 1 billion 42 crore 1 lakh 14 thousand 360.  The population of India is 1 billion 36 crore 88 lakh 91 thousand 350.  India is followed by the United States (32.91 million 17 thousand 435), Indonesia (26.95 million 65 thousand 198) and Brazil (21.24 million 8 thousand 655).  The population of Maharashtra has gone up to 12 crores.  Over seven crore children are born and two crore die every year.  This means that the world's population increases by four crore every year.  The world's population continued to grow until the fifteenth century.  But from the sixteenth century to the twentieth century, her graph went straight up.  Although her horse race has now come to a halt due to global efforts, the current population is at risk.  It is going to grow again.  Even today, the annual growth rate is 1.09.  If this rate continues to rise for 40 years, the population will reach 9 billion in 2035, 10 billion in 2055 and 11 billion in 2090, when all the world's natural resources will be depleted.  With the current huge numbers, the country will have many questions on how to provide drinking water, food and facilities.  Such a huge number of species is not only dangerous for biodiversity, but also for the species itself.  So now we have to follow the motto 'One family, one child'.  Only then can the population come under control.

 India's situation is critical
 India accounts for 17.74 per cent of the world's population.  This includes 70 crore 31 lakh 71 thousand 159 men and 65 crore 87 lakh 2 thousand 183 women.  Every year 2 crore 69 lakh 32 thousand 586 people are born and 97 lakh 78 thousand 073 people die.  Given this proportion, the population will continue to grow.  This population covers an area of ​​32 lakh 87 thousand 260 square kilometers.  Its density is 460 per km.  Uttar Pradesh is the largest and most populous state in India and today its population is 21 crore 81 lakh 58 thousand 267 (17 per cent) which is the same as Brazil.  Maharashtra ranks second in the country. Mumbai alone has a population of 12.5 crore, followed by Delhi.  If the area of ​​land is less and the population is more inequality, then the stress falls on all the natural resources, living standards and overall progress of the country and the country lags behind.

 Serious environmental problems
 According to the laws of nature, the population of living things comes under control.  Nature also controls how many vegetarian animals there should be, how many non-vegetarian animals there should be, and which trees should be in order to maintain the balance of nature through the food chain.  Due to this, less carnivores and more herbivores are born.  Since man no longer has a natural enemy, there is no one to control his birth rate, and so the number of humans is rapidly increasing and increasing.  Advances in technology and medicine have increased human life expectancy and reduced mortality.
 Natural resources began to be used extensively to provide food, clothing, and shelter to the population.  Large scale deforestation took place for many uses like industrialization, mining, agriculture, cities, dams, roads, railways etc.  Even today, beautiful forests and wildlife are declining for the same reason.  The problem is not limited to pollution, global warming, climate change, and natural disasters.  We are destroying the forests that gave birth to us, the environment that kept us alive, the wildlife that supported us in coexistence, this simple thing should not be known to intelligent human beings!  I still don't understand.  Today, when we reach the threshold of death, we are saying, 'Plant trees, live trees'.  On the other hand, a growing population is destroying forests.  Every year thousands of hectares of forest are cut down in the country for agriculture and settlement.  Rivers, streams and groundwater, food and shelter for industry are in short supply for a growing population.  Natural resources are being destroyed.  Population has disturbed the balance of nature as a whole.

 Decreased living standards

 Due to population growth, people turned to cities in search of employment.  On the one hand, unemployment has risen.  Job opportunities dwindled.  The slums grew.  Poverty increased.  Health facilities became inadequate.  The disease increased.  Decreased standard of living due to lack of education.  Cities began to swell due to the increasing influx of people.  Pollution increased.  There was a shortage of drinking water.  This means that population growth alone is contributing to the environment, pollution, natural resources and human degradation.  The development of technology has certainly benefited some people, but it has also increased unemployment and poverty.  Environment, pollution problems were created.  The growing population of the country wants jobs, but due to the development of new technologies, machines have taken the place of minds.  One machine in the mine started working for a hundred people, computers in the office for ten people.  With the advent of mobiles, cameras and new systems, the need for workers has been reduced.
 In a populous country like India, human energy should have been used.  This would have reduced unemployment.  The standard of living would have been higher, but we did not pay attention to this aspect.  This same growing population today is subsisting on deforestation, killing wildlife for agriculture, living, fuel for survival.  The government is clearing forests, building roads, railways, dams, canals, power lines and industries to cater to this growing population.  All these unnatural developments are destroying all natural resources.  If we do not cover the ashes of the population today, then tomorrow the same population will destroy us and nature.  Reducing the population is the key to preserving the environment and nature.  Population can be reduced only if public education, temptation and the equation of 'one family, one child' are maintained for the common man.  It requires strict laws, various schemes.  More importantly, the will of the government is needed.


-------------#satishmarji9911#-------------

Comments

Popular Posts