How To Reduce Stress

तुमच्या आयुष्यातील तणावा ला करा बाय-बाय (How To Reduce Stress In Marathi)

      सिने मे जलन आंखों में तूफ़ान सा क्यों है.. इस शहर में हर शख़्स परेशान सा क्यों है’ हे फक्त गाणं नाही तर कधीकधी खऱ्या आयुष्यातही तुमच्यासोबत असं होतं असतं. प्रत्येक जण स्वःताला सिद्ध करण्यासाठीच्या चढाओढीत सामील झाला आहे. पण या सगळ्यात टेन्शनचं रुपांतर स्ट्रेसमध्ये कधी होतं ते कळतंच नाही. खरंतर, स्ट्रेस म्हणजेच तणाव हे शरीराची अशी परिस्थिती असते ज्यामध्ये आपल्या आयुष्यात अचानक बदल होतो आणि ज्यावर आपलं शरीर भावनात्मक आणि शारीरिक प्रतिक्रिया देतं. जेव्हा आपल्या मेंदूला व्यवस्थित आराम मिळत नाही, तेव्हा तो थकतो आणि या थकव्यामुळेच आपल्यावरील तणाव वाढतो. जर तणावावर योग्य वेळी उपाय केला तर त्यातून बाहेर पडणं सोप्पं होतं. त्यामुळेच आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत, टेन्शन कमी करण्यासाठी उपाय 15 सोपे उपाय. ज्यामुळे तुमचा स्ट्रेस होईल गायब.

15 तणाव कमी करण्याचे उपाय (How To Reduce Stress )

एकावेळी एकच काम करा (Do One Thing At A Time)

   धावपळीच्या आयुष्यात आपण एकावेळी अनेक काम करण्याच्या प्रयत्नात असतो. ज्यामुळे आपलं टेन्शन वाढत जातं. असं करू नका आणि एकावेळी एकाच कामाला प्राधान्य द्या. यामुळे तुमचं कामंही चांगलं होईल आणि तुम्हाला कोणत्याही प्रकारचा स्ट्रेसही जाणवणार नाही.

थंड पाण्याने आंघोळ करा (Cold Water Bath)


        टेन्शनला बाय बाय करण्यासाठी हा सर्वोत्तम उपाय आहे. जेव्हा तुम्हाला खूप स्ट्रेस्ड वाटेल तेव्हा थंड पाण्याने आंघोळ करा. मग बघा, तुम्हाला नक्कीच फ्रेश वाटेल. खरंतर, जेव्हा आपल्या शरीरावर थंड पाण्याची धार पडते तेव्हाच आपला तणाव कमी करणाऱ्या हार्मोन्सची निर्मिती होऊ लागते.

भरपूर झोप घ्या (Get Enough Sleep)

जर तुम्ही रोज 7 ते 8 तास झोप घेतली तर तुमचा स्ट्रेस तुमच्यापासून दूरच राहील. पण त्यासाठी तुम्हाला कोणत्याही ब्रेकशिवाय व्यवस्थित झोप घ्यावी लागेल, तरच फायदा आहे. जेव्हा आपण गाढ झोपेत असतो तेव्हा आपलं मेंदूला आराम मिळतो आणि त्यामुळे आपल्यालाही आपोआपच फ्रेश वाटतं.

जे चांगलं वाटेल ते करा (Do What Feels Good)

काही वेळा मेंदूऐवजी मनाचं ऐका. जर तुम्हाला संगीत ऐकायला, डान्स करायला किंवा मेकअप करायला आवडत असेल तर जेव्हा जे करायची इच्छा होईल ते जरूर करा. त्यामुळे तुमच्या मनाला शांतता मिळेल आणि म्हणतात ना मन चांगल असेल तर जग चांगल.

योग्य लाईफस्टाइल फॉलो करा (Floow The Right Lifestyle)


असं म्हणतात की, प्रत्येक गोष्ट होण्याची योग्य वेळ असते. पण आपल्याला ही गोष्ट फॉलो करणं जमत नाही आणि यामुळे विनाकारण आपल्याला अनेक गोष्टींचा सामना करावा लागतो. स्ट्रेसला दूर ठेवण्यासाठी तुमची लाईफस्टाईल योग्य असणं गरजेचं आहे. जसं योग्य वेळी झोपणं गरजेचं आहे,तसंच सकाळी योग्य वेळी उठणंही आवश्यक आहे. योग्य वेळी जेवण आणि व्यायामसुद्धा गरजेचा आहे.

बागकाम करा (Do Gardening)

काही संशोधनांमध्ये असं आढळून आलंय की, आपल्या बागकामाच्या आवडीला वेळ देणारे अनेक लोक नेहमी आनंदी आणि निवांत असतात. बागकामामुळे त्यांच्या कुशलतेत वाढ होते. बागकामाला रोजच्या दिनचर्येत सामील करणाऱ्या लोकांमध्ये कॉर्टिसॉल, ज्याला स्ट्रेस हार्मोन असंही म्हटलं जातं, या हार्मोनचा स्तर कमी असतो. याचाच अर्थ असा आहे की, मातीत हात घातल्यावर तुमचे हात खराब होतात पण टेन्शन गायब होतं.

केळं खा आणि स्ट्रेस फ्री राहा (Eat Banana)

केळं हे आपल्या शरीरातील स्ट्रेस लेव्हल कमी करण्यात मदत करतं. केळ्यांमध्ये टाइप्टोफॉन नावाचं अमिनो अॅसिड असतं, जे तुमचा मूड रिलॅक्स करतं. स्ट्रेस किंवा डिप्रेशनने ग्रस्त असलेल्या व्यक्तीने केळं खाल्ल्यास बरं वाटू लागतं. 

संगीत मनाचं मीत (Listen To Your Favourite Music) 


जेव्हा तुम्हाला उदास वाटू लागेल तेव्हा ताबडतोब तुमचं आवडतं म्युझिक ऐकायला सुरूवात करा. तुमचा मूड सुधारण्यात हे फारच उपयोगी ठरेल. जर शक्य असेल तर गाणं ऐकऐकता ते गुणगुणायला ही सुरूवात करा. ताण दूर करण्याचा आणि स्वःताला चार्ज्डअप करण्याचा हा चांगला उपाय आहे.

हसण्याने मिळेल आनंद (Laughter is the Best Medicine)

मन जर दुःखी असेल तर युट्यूबवरचे फनी व्हिडीओज पाहा. जेव्हा तुम्ही असे फनी व्हिडीओज पाहता तेव्हा तुमचा मूडही बदलतो आणि आत्मविश्वासही वाढतो. फनी व्हिडीओ पाहताना तुम्ही हसता आणि ज्यामुळे तुमची प्रतिकार क्षमता आणि हृदयगती वाढते.

चॉकलेटचा गोडवा हवाहवासा (Eat Chocolate)

चॉकलेट हे नेहमीच आनंदी क्षणांना अजूनच द्विगुणीत करतं. चॉकलेटमधील थियोब्रोमाईनमुळे मेंदूत अशी काही क्रिया होते की, तुम्हाला प्रसन्न वाटू लागतं. मग जेव्हा पुढच्या वेळी तुम्हाला उदास वाटू लागेल तेव्हा चॉकलेट खा आणि आयुष्यातील कडवटपणा दूर करा.

निसर्गाच्या कुशीत आहे खरा आनंद (Nature Is The Key)

नैसर्गिक सौंदर्य तुमच्या मनाला प्रसन्न करतं. यामुळे आपल्या दैनंदिन व्यवहारांवरही सकारात्मक परिणाम होतो. त्यामुळे जर आयुष्यातील तणाव वाढला असल्यास छोटासा ब्रेक घ्या आणि निर्सगाचा आनंद लुटण्यासाठी बाहेर पडा.  

साफ-सफाई करा, टेन्शन पळवा (Start Cleaning)

टेन्शन दूर करण्याचा हाही एक उपाय आहे आणि याचे अनेक फायदे आहेत. त्यामुळे पुढच्यावेळी जेव्हा तुम्हाला उदास किंवा दुःखी वाटेल तेव्हा वेळ वाया न घालवता साफसफाई सुरू करा. साफसफाईने ना केवळ तुम्हाला नको त्या गोष्टींपासून सुटका मिळेल तर तुमच्या डोक्यातील नको त्या विचारांपासूनही सुटका मिळेल. याशिवाय व्यायाम होईल तो वेगळा.

वाचाल तर वाचाल (Read Books)

तणाव कमी करण्याचे उपाय
तुमच्या मनाची दिशा योग्य करण्यासाठी तुम्ही पुस्तकांची मदतही घेऊ शकता. पुस्तक ही माणसाचा सर्वात चांगला मित्र आहेत. प्रत्येक पुस्तक तुम्हाला नक्कीच काहीतरी चांगल देतं आणि कधीच रिकाम्या हाती पाठवत नाही. पुस्तकांकडे नेहमीच तुम्हाला नवीन काहीतरी शिकवतात आणि नवीन दिशा देतात. तुमचा मूड जर बदलण्यासाठी तुम्ही कॉमिक्सही वाचू शकता. ज्यामुळे गंभीर मूडचं रूपांतर चांगल्यामध्ये होईल.  

तुमच्या जवळच्या व्यक्तीच्या सान्निध्यात (Talk To Others, Share Your Problem)

तुमच्या मनातील गोष्ट मनातच ठेऊ नका. तुमच्या मनातील चिंता जवळच्या व्यक्तींशी शेअर करा. यामुळे तुमचं दुःख हलकं होई आणि चिंता दूर करण्यातही मदत मिळेल. तसंच त्या गोष्टींचा दुसरा पैलूंही पाहता येईल.

ध्‍यानधारणा करा (Meditation)


जर तुम्हाला सकारात्मक राहायचं असेल तर तुमच्या आयुष्यात ध्यानधारणेचा समावेश करा. रोज फक्त पाच मिनिटं ध्यान करा. जे तुम्हाला भावनात्मक आणि शारिरीक रूपाने उर्जा देतं. ध्यानधारणा केल्याने प्रसन्न वाटतं आणि सोबतच तुमच्या अंर्तमनाशीही संवाद साधता येतो.

मग पुढच्यावेळी स्ट्रेस जाणवला तर हे उपाय नक्की करून पाहा.


--------------#satishmarji#------------------

Comments

Popular Posts