# The Greatest scientists Albert Einstein


 
       विसाव्या दशकातील सर्वात मोठे वैज्ञानिक म्हणून ते पावले. असामान्य बुद्धिमत्तेच्या जोरावर लावलेल्या असामान्य शोधाने जगाला दीपवून टाकणारा शास्त्रज्ञ.संशोधन करताना वा जीवनात झालेल्या चुकांवर आईन्स्टाईन कधीच पश्चाताप करीत नव्हते. उलट ते म्हणायचे, 'ज्या व्यक्तीने कधी चूकच केली नाही, त्याने नवीन काही करण्याचा प्रयत्न केला नाही.'ब्रह्मांडातील कोणतेही गुपीत समजण्याच्या बाबतीतही त्यांचे स्पष्ट मत होतं, जर सहा वर्षांच्या मुलाला तुम्ही एखादी गोष्ट समजावून सांगू शकत नसाल, तर तुम्हाला​ सुद्धा ती गोष्ट समजलेले नाहीत.
        E=mc2, सापेक्षतावादाचा सिद्धांत, 300 पेक्षा जास्त शोधनिबंध, सैद्धांतिक भौतिक विशेषत : प्रकाश-विद्युत उत्तरजनाच्या संशोधन 1921 मध्ये नोबेल मिळविलेले आईन्स्टाईन अभ्यासात मात्र फारसे हुशार नव्हते वयाच्या चौथ्या वर्षापर्यंत ते बोलेलेच नाहीत. नऊ वर्षापर्यंत ते अडखळत बोलत होते. त्यांची स्मरणशक्ती कमजोर होती, असे म्हटल जाते. शाळेतील त्यांच्या प्रश्न विचारण्याच्या पद्धतीने आणि एकांतात राहण्यामुळे त्यांच्या शिक्षकांना ते मंदबुद्धी असावेत, असे वाटत होते. आईनस्टाईनला सुद्धा शाळा पसंत नव्हती. 'शाळा असे ठिकाण आहे जेथे स्वातंत्र्य नाही,' असे ते म्हणायचे. मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी खुलेपणा गरजेचा असतो, असे त्यांचे स्पष्ट मत होते. कडक शिस्तीसाठी स्वतःच्या मुलांना मोठया शाळेत टाकणाऱ्या पालकांनी एकदा आईन्स्टाईन चे आत्मचरित्र जरूर वाचावे, म्हणजे ते असे का म्हणायचे,त्यामागील शास्त्रीय कारणे कोणते होती, हे आमच्या उच्चशिक्षित पालकां समजेल.असताना
स्वित्झर्लंड मध्ये त्यांनी कॉलेजमध्ये प्रवेशासाठी एन्ट्रन्स एक्झाम दिली. त्यात सायन्स आणि मॅथ विषय वगळता इतर विषयात ते अनुत्तीर्ण झालेत, परंतु त्यांचे सायन्स आणि मंथ मध्ये मिळालेले सर्वाधिक गुण पाहून मॅनेजमेंटने त्यांना कॉलेजमध्ये प्रवेश दिला. अभ्यासात सर्वसाधारण असलेल्या या मुलाला पुढे अमेरिका आणि युरोपातील नामांकित विद्यापीठानी मानद डॉक्टरेट पदवी देऊन सन्मानित केले. पेटंट कार्यालय क्लर्कची नोकरी करीत असतानाच त्यांनी फावल्या वेळेचा उपयोग त्यांच्या संशोधनासाठी केला.वेळेचा सदुपयोग किती महत्त्वाचा असतो, हे त्यांनी प्रत्यक्ष कर्तृत्वातून दाखवून दिले. शरीर आणि वेळ ही निसर्गाने दिलेली सर्वात मोठी देणगी आहे. तुम्हाला मिळालेल्याबुद्धिमत्ता उपयोग वेळेच्या सुयोग्य गुंतवणुकीसाठी केल्यास विश्वातील अनेक रहस्ये जाणून घेण्यास मदत होऊ शकते, असे ते विद्यार्थ्यांना म्हणत असत. ब्रम्हांड गतिशील आहे.
विश्वातील प्रत्येक वस्तू गतिशील आहे, नव्हे ब्रम्हांडातील कोणत्याही वस्तूला स्थिरत्व मान्य नाही, असे ते म्हणत. हे त्यांनी प्रत्यक्ष प्रयोगाद्वारा सिद्ध करून दाखवले बळाशिवाय गती नाही, या न्यूटनच्या सिद्धांताला येथेच आव्हान मिळाले प्रत्येक वस्तू गतिशील असली तरी प्रकृती आपली मूलभूत चौकट कधीच ओलांडत नाही, हे ही त्यांनी स्पष्ट केले. म्हणूनच त्यांचा सापेक्षतावादाचा सिद्धांत समजायला सोपा वाटत असला, तरी प्रयोगासाठी अत्यंत अवघड ठरतो. त्यांनी मांडलेले सिद्धांत कमालीचे होते. 'वेळ' सुद्धा निरपेक्ष नाही, ती सुद्धा स्थळ काळानुसार सापेक्ष आहे, हे त्यांनी गणित पद्धतीने सिद्ध केले. खरेतर, सापेक्षतावाद समजावून सांगण्यासाठी त्यांनी अत्यंत सोपी उदाहरणे दिलीत, प्रत्येक विद्यार्थ्यांनी ती गुगल करून समजावून घ्यावी म्हणजे आईन्टाईनची कल्पनाशक्ती किती जबरदस्त होती, हे लक्षात येईल.
          
     दुसऱ्या महायुद्धानंतर या वैज्ञानिकाला इस्रायलने राष्ट्रपतीपदाची ऑफर दिली.आईन्स्टानने ती विनम्रपणे नाकारली.मला प्रकाशाच्या वेगाने स्पेसमध्ये सोडले, तर मी हजारो वर्षे जगू शकेल, असे म्हणणाऱ्या या असामान्य वैज्ञानिकाने वयाच्या 76 व्या वर्षी जगाचा निरोप घेतला.आजही त्यांच्या जन्मदिन 14 मार्च, संपूर्ण जगात "जीनियस डे' म्हणून साजरा केला जातो.
------+------------+---------------+-----------+---------------
   English Translation :-


     He rose to become one of the greatest scientists of the twenties.  A scientist who illuminated the world with his extraordinary discoveries based on extraordinary intelligence.  When doing research or on mistakes made in life.  Einstein never repented.  Instead, he would say, 'A person who has never made a mistake has never tried something new.'
       E = mc2, the theory of relativity, more than 300 dissertations, theoretical physics, especially research on the photoelectric sequence, was not very clever in the 1921 Nobel Prize-winning Einstein study, but he did not speak until the fourth year of age.  He had been stumbling for nine years.  His memory was said to be weak.  His questioning at school and his solitary confinement made his teachers think he must be dull.  Even Einstein did not like school.  'School is a place where there is no freedom,' he would say.  He was of the clear view that openness is essential for the holistic development of children.  Parents who send their children to high school for strict discipline must read Einstein's autobiography once, so that our highly educated parents will understand why he said that, what were the scientific reasons behind it.
  In Switzerland, he took the entrance exam for college admission.  He failed in all subjects except Science and Math, but seeing his highest marks in Science and Math, the management admitted him to the college.  The boy, who excelled in his studies, was later awarded an honorary doctorate by a reputed university in the United States and Europe.  While working as a clerk in the patent office, he used his spare time for his research.  He demonstrated the importance of time management.  Body and time are the greatest gifts given by nature.  He used to tell the students that using the intelligence you have acquired for the right investment of time can help you to know many secrets of the universe.  The universe is dynamic.
  He said that every object in the universe is dynamic, not that any object in the universe is stable.  This is what he proved by actual experiment. There is no motion without force. Newton's theory was challenged here. He explained that although everything is moving, nature never crosses its basic framework.  So while his theory of relativity may seem easy to understand, it is extremely difficult to experiment with.  The theory he put forward was amazing.  He proved mathematically that 'time' is not absolute, it is also relative to place and time.  In fact, he gave very simple examples to explain relativity, every student should google it so that you can see how powerful Einstein's imagination was.
      
      After World War II, the scientist was offered the presidency by Israel. Einstein politely declined.  This 76-year-old scientist said goodbye to the world at the age of 76, saying that if I were released into space at the speed of light, I could live for thousands of years.  Even today, his birthday, March 14, is celebrated all over the world as "Genius Day".

Comments

Popular Posts