वटवृक्ष अकॅडमी.. अक्कलकोट
म्हणून ताटात अन्न उष्टे टाकू नये :- ताटातलं पूर्ण अन्न संपवणाऱ्या एका बालकाचे मित्र त्याची थट्टा करायचे. एक दिवस त्याच्या मित्राने विचारलं, तू रोज ताटात एक कणसुद्धा का सोडत नाहीस? त्यावर त्या बालकाने उत्तर दिले, तो म्हणाला याची तीन कारणे आहेत - हा माझ्या वडिलांप्रति आदर आहे, जे हे अन्न मेहनतीने कमावलेल्या रुपयांनी विकत घेतात. . हा माझ्या आईविषयीचा आदर आहे, जी सकाळी लवकर उठून मोठ्या चवीने हे अन्न शिजवते. . हा माझ्या , देशातल्या त्या शेतकऱ्यांविषयीचा आदर आहे. जे शेतात उपाशी राहून, खूप मेहनत करून हे पिकवतात. म्हणून ताटात उष्टं अन्न टाकू नये.