# Steven Schwarzmann (स्टीव्हन श्वॉर्झमन)

                          व्यक्तिविशेष
                        स्टीव्हन श्वॉर्झमन
        एखाद्या उद्योजक आणि व्यावसायिक त्याच्या या प्रवासात अनेक चढउतारांवरून गेलेला असतो. या दरम्यान त्याला अशी त्याच्या या क्षेत्राची अधिकाधिक ओळ होत जाते. तसेच जीवनमूल्येही समजत जातात. लेक रॉक लोग समूहाचे संस्थापक अध्यक्ष स्टीव्हन  स्वाभिमान या बहुरंगी व्यक्तिमत्त्वाच्या या उद्योग समूहातील कंपन्यांमध्ये पाच लाखांवर कर्मचारी आहेत.
त्यांच्या सर्व कंपन्यांचे एकत्रित उत्पन्न 100 अब्ज डॉलर्स आणि जगभरातली त्यांची एकूण संपत्ती 250 अब्ज डॉलर्स आहे. व्यवसायात यशोशिखरावर असलेल्या या उद्योजकाने 'व्हॉट इट टेक्स या आत्मकथनातून आपल्या यशाचे रहस्य सांगून तरुण होतकरू उद्योजक आणि व्यवस्थापकांना गुरुमंत्र दिला आहे.'
 
   केनडी सेंटर ऑफ पासिंग आर्ट्सया संस्थेच्या अध्यक्षपदी राहिलेल्या या उद्योजकाने एमआयटी, येल, ऑक्सफर्ड अशा विद्यापीठांना आणि सार्वजनिक      वाचनालये, काव्य कला आणि क्रीडा क्षेत्रातील उपक्रमांना सढळ हस्ते एक अब्ज डॉलर्सची मदत केली. 2016 च्या रिओ ऑलिंपिक स्पर्धांमध्ये त्याने अर्थसहाय्य केलेल्या खेळाडू चार सुवर्ण, तीन रौप्य आणि दोन कांस्य पदके मिळवली. 'जर तुलाराजकारणात पडायचे असेल, तर आधी तू भरपूर पैसा कमावून ठेव,' असा सल्ला त्याला सुरुवातीच्या काळात मिळाला. त्यावेळी वॉल स्ट्रीट वरच्या कंपन्या आधुनिक व्यवसायांपेक्षा गोळ्या सारख्या होत्या. इतरांना पराभूत होताना पाहणे, याचाच त्यांना विशेष आनंद व्हायचा, असा अनुभव  त्यांनी नोंदलेला आहे. न काहीही झाले तरी आपला गुंतवणुकीतील पैशाला हात लावायचा नाही, , असा नियम करून त्यांनी तो आयुष्यभर पाळला  संपत्ती म्हणजे रोख, भाग गोष्टींशिवाय कंपन्या आणि स्थावर मालमत्ता अशा इतरही अनेक प्रकारच्या मलत्तेची खरेदी विक्री केली, 2008 च्या आर्थिक मंदीत बांधकाम व्यवसाय गडगडत असताना निर्माण झालेली एकत्रीकरण आणि व्यावसायिकीकरणाची संधी त्यांनी साधली.  लोकांना स्वतःच्या समस्या आणि त्यावरचे उपाय यात सर्वाधिक स्वारस्य असते. जितकी समस्या कठीण आणि उपाय धोकादायक, तितकी त्यांना तुमच्या मदतीची किंमत वाटते, असा त्यांचा अनुभव आहे. अशा परिस्थितीत तो तणावाखाली कोलमडून न पडता आहे त्या परिस्थितीशी चांगले जुळवून घेऊ शकतो, हे त्याच्या यशाचे एक कारण असल्याचे त्यांनी म्हटले आहे. लोकांशी मोठ्या आर्थिक उलाढाली करताना इतरांचे मानसिक दुबळेपण हुडकणे आणि त्याचा वापर वाटाघाटी करताना करण्याचा  मार्ग त्यांनी अनेकदा अवलंबिला. मात्र, कोणतीही कंपनी मूळ मालकाच्या मर्जी विरुद्ध कधीही विकत घेतली नाही, असे ते
म्हणतात.

      अति उत्साहाच्या भरात आपल्या आवाक्याबाहेरची कामे अंगावर घेऊन त्यांचा विचका करून टाकणे, यात काहीही अभिमानास्पद नाही, असा इशाराही त्यांनी आपल्या सहकाऱ्यांना नेहमीच देतानाच कुठल्याही अडचणीत मदत मागायला संकोच करू नका, असा दिलासाही दिलेला आहे. व्यवसायातल्या जीवघेण्या स्पर्धेत लोकांच्या भावनांकडे लक्ष द्यायला आम्हाला वेळ नाही, अशी त्यांची प्रारंभीची भूमिका चूकच होती, हे ते प्रांजळपणे मान्य करतात. उद्योजकतेच्या संदर्भात लेखकाने विद्यार्थ्यांचे काही महत्त्वाचे नियम सांगितलेले आहेत. (1) तुमच्या कल्पनेचा आवाका मोठा हवा.
 (2) तुमची कल्पना एकमेवाद्वितीय असली पाहिजे.
 (3) बाजारात उतरण्यासाठी ती योग्य वेळ असली पाहिजे.
त्यांची ध्येय धोरणे रिपब्लिकन पक्षाच्या विचार सारणी नुसार भांडवलदार धार्जिणी असल्याची टीका त्यांनी अनेकदा झेलली. बराक ओबामा राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतरच्या दोन महिन्यांत शेअर बाजार 25 टक्क्यांनी कोसळलेला होता. अशा ओव्या अध्यक्षांनी आरोग्य सेवा प्राधान्य देण्याबाबत स्टीव्हन  यांनी दर्शवूनही ओबामा यांनी त्यांना सल्लागार म्हणून नेमलेले होते. सर्वोत्कृष्ट व्यवस्थापक घडवले जातात, ते जन्मतः नसतात. तुम्ही चांगले व्यवस्थापक कसे बनायचे, हे शिकून घेऊ शकता, तुम्ही नेतृत्व गुण शिकून घेऊ शकता, पण उद्योजक कसे बनावे, हे शिकून घेता येत नाही, असे त्यांचे मत मुळतून विचार करायला लावणारेच आहे .

⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️
Subscribe to this blog and share with your friends and family and comment in the comment box if you like.,🙏💐💐


----------#satishmarji#----------------------

----------------#satishmarji#------------

Comments

Popular Posts